एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या ४० आमदारांनी उठाव केल्यानंतर ठाकरे गटातील गळती थांबण्याचे नाव घ्यायला तयार नाही. मनीषा कायंदे, नीलम गोऱ्हे यांच्या पाठोपाठ आता मुंबईतील आणखी एक आमदार शिंदेंच्या गळाला लागल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली.
(हेही वाचा – Vijay Wadettiwar : अखेर विरोधीपक्ष नेतेपदी विजय वडेट्टीवार विराजमान)
उद्धव ठाकरे यांचा अत्यंत विश्वासू आणि शिवसेनेशी एकनिष्ठ, अशी या आमदाराची ओळख आहे. शाखाप्रमुख, नगरसेवक, बेस्ट चेअरमन, विभागप्रमुख ते दोन टर्म आमदार असा प्रवास असलेल्या या आमदाराला एकाएकी विभागप्रमुख पदावरून दूर करण्यात आले आहे. त्याच्या जागी उप विभागप्रमुखाची वर्णी लावण्यात आली आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर मोठी जबाबदारी काढून घेतल्याने हा आमदार नाराज आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही संधी साधून या आमदाराला जवळ करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. बुधवारी विधिमंडळ परिसरात शिंदे आणि संबंधित आमदाराची भेट झाली. त्यावेळी या दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली, याचा तपशील हाती लागला नसला, तरी शिंदे यांनी या आमदाराला शिवसेनेत प्रवेश करण्याची ऑफर दिल्याचे कळते.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community