राष्ट्रवादीचे (NCP) कृषिमंत्री धनंजय मुंडे हे सरपंच सुनील देशमुख यांच्या हत्येप्रकरणी याआधीच अडचणीत आले असताना आता राष्ट्रवादीचे आणखी एक मंत्री अडचणीत सापडले आहेत. कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने त्यांना फसवणूक केल्याप्रकरणी २ वर्षांचा कारावास आणि ५० हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे. ठाकरे यांनी अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला आहे.
१९९५ साली कागदपत्रामध्ये फेरफार करून फसवणूक केल्याचा आरोपाखाली माणिकराव कोकाटे आणि त्यांच्या बंधूंवर गुन्हा दाखल होता. त्या प्रकरणी न्यायालयाने अंतिम सुनावणी सुरू असताना दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून या खटल्यात माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू सुनील कोकाटे यांना दोषी ठरवले. माजी मंत्री तुकाराम दिघोंळेंनी कोकाटे बंधूंविरोधात न्यायालयात याचिका दाखल केली होती. या खटल्यावर अखेर न्यायालयाने निकाल दिला आहे. आता न्यायालयाने २ वर्षापेक्षा अधिक शिक्षा सुनावल्याने माणिकराव कोकाटे यांची आमदारकी आणि मंत्रिपदही धोक्यात आले आहे. एखाद्या नेत्याला २ वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक शिक्षा न्यायालयाने सुनावली तर त्याचे सदस्यता तात्काळ रद्द होईल, असा सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे. या आदेशाने फौजदारी प्रकरणांमध्ये दोषी ठरलेल्या खासदार आणि आमदारांना उच्च न्यायालयात अपील प्रलंबित होईपर्यंत अपात्र ठरवण्यापासून संरक्षण देणारी तरतूद रद्द केली होती. (NCP)
Join Our WhatsApp Community