वेदांताचा दुसराही प्रकल्प, महाराष्ट्राचा विचार – अनिल अग्रवाल

172

सेमी कंडक्टरचे उत्पादन करणाऱ्या फॉक्सकॉन आणि वेदांता या दोन कंपन्यांचा संयुक्त प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातमध्ये वळवण्यात आल्याने महाराष्ट्रात राजकीय पातळीवर आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. अशा वेळी वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांनी आमचा गुजरातमध्ये प्रकल्प होणार असला तरी गुजरातमधील प्रकल्पाचा दुसरा प्लांटही उभा राहणार आहे. त्याकरता आमच्याकडे महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशकडूनही प्रस्ताव आला आहे. गुजरातमधील प्रकल्प कार्यान्वित झाल्यावर आम्ही दुसऱ्या प्रकल्पात लक्ष घालू, असे म्हणाले.

भारताची सिलिकॉन व्हॅली होईल

2024 पासून गुजरात युनिटमधून प्रॉडक्शनला सुरूवात होईल. तिथे या प्रकल्पासाठी 400 एकर जमीन कंपनीला मिळाली आहे, ही जमीन अहमदाबादपासून जवळ आहे, ‘केपीएमजी आणि आमची टीम सगळ्या राज्यांमध्ये गेली होती, त्यांनी गुजरातला पसंती दिली. देशात सिलिकॉन पॉलिसी सुरू करणारे गुजरात पहिले राज्य आहे, त्यामुळे आमच्या स्वतंत्र यंत्रणेने हे प्रोजेक्ट गुजरातला स्थापन करण्याचे ठरवले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हे केले, असे कोणत्याही परिस्थितीमध्ये समजू नका, असेही अनिल अग्रवाल म्हणाले. ‘गुजरात प्लांटमुळे स्टार्ट अपच्या संधीही मोठ्या प्रमाणावर तयार होतील. इतर इंडस्ट्रीजही इकडून त्यांच्या कामाला सुरूवात करतील, त्यामुळे हा परिसर भारताची सिलिकॉन व्हॅली होईल,  असा विश्वास अग्रवाल यांनी व्यक्त केला. तसेच चिप बनवण्याच्या युनिटसाठी आम्ही इंडस्ट्रीयल क्लस्टर उभारणीला प्रोत्साहन देणार आहेत, यासाठी महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार आणि आंध्र प्रदेश सरकारसोबत बोलणी सुरू आहेत,’ असे अग्रवाल यांनी सांगितले.

(हेही वाचा गोव्यात ‘ऑपरेशन लोटस’ नंतर सुरू झाला #BikGayiCongress ट्विटर ट्रेंड)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.