Pandharpur Wari : आळंदीमध्ये मंदिरात पोलिसांसोबत झटापट करणारे तरुण खरंच वारकरी होते का?

रविवारी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या प्रस्तानावेळी मंदिराच्या बाहेर पोलीस आणि तरुण वारकरी समोरासमोर आले होते त्यांच्यात झटापट झाली होती.

206

संतश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधी मंदिराच्या समोर काही वारकरी यांनी मंदिरात घुसण्याचा प्रयत्न केला. मागील वर्षी या ठिकाणी चेंगराचेंगरी झाली होती. त्यामुळे यंदाच्या वर्षी या ठिकाणी सरसकट वारकरी यांनी प्रवेश नसताना काही जण जबरदस्तीने मंदिरात घुसण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळे पोलिसांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसांनी वारक-यांवर लाठीमार केल्याचा आरोप होऊ लागला. मात्र सोमवारी आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये काही तरुण पोलिसांना तुडवत, त्यांना धक्काबुक्की करत मंदिरात घुसण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळे हे तरुण वारकरी होते का, असा प्रश्न आता उपस्थित झाला असून पोलिस त्या दृष्टीने तपास करू लागले आहेत.

आळंदीमध्ये वारकरी लाठीमार प्रकरण ताजे असतांना आता या ठिकाणचा आणखी व्हिडीओ समोर आला असून तो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये पोलिसांनी थांबवण्याचा प्रयत्न केला असतांनाही काही तरुण हे नियम डावलून पोलिसांना धक्काबुक्की करत, मागे ढकलत आणि त्यानंतर पोलिसांना तुडवत मंदिराच्या दिशेने धावत असल्याचे पाहायला मिळत आहे. रविवारी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या प्रस्तानावेळी मंदिराच्या बाहेर पोलीस आणि तरुण वारकरी समोरासमोर आले होते त्यांच्यात झटापट झाली होती.

(हेही वाचा pandharpur wari 2023 : न घडलेल्या घटनेचे राजकारण करू नका; वारकऱ्यांची सुरक्षा महत्वाची – देवेंद्र फडणवीस)

संतश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधी मंदिराच्या समोर काही तरुण मंदिरात शिरण्याचा प्रयत्न करत होते. त्यांना अडवताना पोलिसांनी सौम्य लाठीमार केला होता. मात्र तो लाठीमार झालेला नाही, किरकोळ झटापट झाल्याचा खुलासा पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी केला होता. तर विरोधी पक्षांनी या घटनेवरुन राज्य सरकारवर सडकून टीका केली होती. असे असतांना रविवारचा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. यामुळे या सर्व वादाला आणखी वेगळे वळण मिळण्याची शक्यता आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.