‘लव्ह जिहादविरोधी कायदा’ (Anti-Love Jihad Law) करण्याविषयी शासन अत्यंत गंभीर आहे. कायद्यासंदर्भात राज्य शासनाने बऱ्याच गोष्टी केल्या आहेत. लवकरच या संदर्भात तुम्हाला निर्णय समजेल, असे स्पष्ट आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिले.
ते ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात (Anti-Love Jihad Law) महाराष्ट्रभरात काढण्यात आलेल्या विविध मोर्च्याच्या प्रतिनिधींसोबत आयोजित बैठकीत बोलत होते. या वेळी मुख्यमंत्र्यांसह ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, मदत व पुनर्वसन मंत्री संजय राठोड, शिवसेनेचे मुख्य प्रतोद आमदार भरत गोगावले आणि आमदार प्रताप सरनाईक हेही उपस्थित होते.
(हेही वाचा – Love Jihad In Nagar : शिकवणीच्या नावाखाली मुसलमान शिक्षिका देते लव्ह जिहाद आणि धर्मांतराचे धडे)
हिंदु जनजागृती समितीचे राज्य संघटक सुनील घनवट म्हणाले की,
“महाराष्ट्रात ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात (Anti-Love Jihad Law) प्रत्येक जिल्ह्यांत, तालुक्यांत आणि शहारांत लाखोंच्या संख्येने मोर्चे काढण्यात आले होते. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातही ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात कठोर कायदा करण्यात येईल, असे आश्वासन दिले होते; मात्र आता एक वर्ष उलटून गेले आहे. तरी लव्ह जिहादविरोधी (Anti-Love Jihad Law) कायदा झालेला नाही. मात्र देशातील उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, हरियाणा, मध्य प्रदेश, गुजरात आदी राज्यांनी ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात कायदा केला आहे. महाराष्ट्रातही लवकर कायदा व्हावा, अशी शिष्टमंडळाची मागणी आहे.
(हेही वाचा – Love Jihad Committee : श्रद्धा वालकर प्रकरणानंतर स्थापन केलेल्या समितीवर समाजवादी पक्षाचा आक्षेप; म्हणे रद्द करा !)
शासनाची भूमिका स्पष्ट करतांना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की,
“सरकार कोणत्या विचारांचे आहे, हे तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे लव्ह जिहादसंदर्भात (Anti-Love Jihad Law) राज्य सरकारने एक-एक करून निर्णय घ्यायला प्रारंभ केला आहे. शासनाची भूमिका काय आहे, हे आम्ही प्रतापगडावरील कृतीने दाखवून दिले आहे. त्यामुळे शासन तुमच्या भूमिकेशी पूर्णपणे सहमत आहे. कायद्याविषयी शासनाने काय केले, यासाठी मुंबईला एक ठराविक माणसांची बैठक घेऊन त्यामध्ये तुम्हाला त्याची माहिती दिली जाईल.”
हेही पहा –
Join Our WhatsApp Community