Anuradha Paudwal : सुप्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांनी केला भाजपात प्रवेश

अनुराधा पौडवाल या एक सुप्रसिद्ध पार्श्वगायिका आहेत. चित्रपट गाण्यांसोबतच त्यांनी भजन गायनाच्या जगात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

202
Anuradha Paudwal : सुप्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांनी केला भाजपात प्रवेश

लोकप्रिय गायिका अनुराधा पौडवाल (Anuradha Paudwal) यांनी आज म्हणजेच शनिवार १६ मार्च रोजी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी अनुराधा पौडवाल यांनी भाजपात प्रवेश केला असून पक्ष त्यांना मोठी जबाबदारी देण्याची शक्यता आहे. त्या पक्षाच्या स्टार प्रचारक असतील असे बोलले जात आहे.

(हेही वाचा – Amit Shah : पाकव्याप्त काश्मीर हा भारताचाच अविभाज्य भाग)

कोण आहेत अनुराधा पौडवाल ?

अनुराधा पौडवाल (Anuradha Paudwal) या एक सुप्रसिद्ध पार्श्वगायिका आहेत. चित्रपट गाण्यांसोबतच त्यांनी भजन गायनाच्या जगात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. २७ ऑक्टोबर १९५४ रोजी मुंबईत जन्मलेल्या अनुराधा यांनी १९७३ मध्ये अमिताभ बच्चन आणि जया प्रदा यांच्या ‘अभिमान’ या चित्रपटातून आपल्या गायन कारकिर्दीला सुरुवात केली. अनुराधा पौडवाल (Anuradha Paudwal) यांना आशिकी, दिल है की मानता नहीं आणि बेटा या चित्रपटांमधील गाण्यांसाठी सर्वोत्कृष्ट गायक या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

(हेही वाचा – Ajit Pawar : बारामतीतील सोमेश्वरनगर येथे १०० खाटांच्या आरोग्य पथकासाठी ७७ कोटी ७९ लाखांचा निधी मंजूर)

अनुराधा पौडवाल (Anuradha Paudwal) यांनी भाजपा कार्यालयात भाजपा नेत्यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.