संसदेत प्रश्न विचारण्यासाठी पैसे घेण्याच्या आरोपाला सामोरे जात असलेल्या तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी संसदेच्या आचार समितीपुढे हजर राहण्यासाठी थोडा वेळ देण्याची मागणी केली आहे. आचार समितीने त्यांना ३१ ऑक्टोबर रोजी हजर राहण्यास सांगितले होते, हे येथे उल्लेखनीय. (Cash For Query Row)
संसदेत प्रश्न विचारण्यासाठी पैसे घेण्याच्या आरोपामुळे सध्या चर्चेत असलेल्या तृणमूल काँग्रेसच्या खासदार यांनी संसदेच्या आचार समितीपुढे हजर होण्यासाठी थोडा वेळ देण्याची मागणी केली आहे. त्या पश्चिम बंगालच्या क्रिष्णानगर मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आल्या आहेत. त्यांनी आचार समितीला पत्र लिहून ३१ ऑक्टोबरला हजर राहण्यात असमर्थता दर्शविली आहे. (Cash For Query Row)
मोईत्रा यांनी पत्रात लिहिले आहे की, ‘४ नोव्हेंबरपर्यंत माझ्या मतदारसंघात पूर्वनियोजित कार्यक्रम आहेत. यामुळे ३१ आक्टोबर रोजी मला समितीपुढे हजर होता येणार नाही. ४ नोव्हेंबरनंतर मी कधीही समितीपुढे हजर होऊ शकते. यामुळे आपण पुढची तारीख द्यावी’. (Cash For Query Row)
Chairman, Ethics Comm announced my 31/10 summons on live TV way before official letter emailed to me at 19:20 hrs. All complaints & suo moto affidavits also released to media. I look forward to deposing immediately after my pre- scheduled constituency programmes end on Nov 4. pic.twitter.com/ARgWeSQiHJ
— Mahua Moitra (@MahuaMoitra) October 27, 2023
एवढेच नव्हे तर, मोईत्रा यांनी पत्रात आचार समितीवर भेदभाव करण्याचा आरोप केला आहे. त्या म्हणाल्या की, भाजप खासदार निशिकांत दुबे आणि वकील जयअनंत देहादराई यांच्या तक्रारींविरुद्ध स्वत:ची बाजू मांडण्यासाठी मी उत्सुक आहे. या तक्रारीची सुनावणी निष्पक्ष व्हावी असे माझे मत होते. परंतु, समितीने माझ्याआधी तक्रारदारांना बोलावून त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. (Cash For Query Row)
आचार समितीने २६ ऑक्टोबर रोजी ‘कॅश फॉर क्वेरी’ प्रकरणात वकील जय अनंत देहाडराय आणि भाजप नेते निशिकांत दुबे यांचे जबाब नोंदवले होते. महुआ मोईत्रा यांनी आपल्यावर नकली पदवीचा आरोप लावला होता. म्हणून आपण त्यांच्यावर आरोप करीत आहात काय? असा प्रश्न यावेळी समितीने दुबे यांना विचारला होता. (Cash For Query Row)
(हेही वाचा – Onion Prices : कांद्याच्या किमती आटोक्यात आणण्यासाठी सरकारी गोदामांत अतिरिक्त कांदा साठवण्याचा सरकारचा निर्णय)
भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी महुआ मोईत्रा यांनी पैसे आणि भेटवस्तूंच्या बदल्यात उद्योगपती दर्शन हिरानंदानी यांच्या हितसंबंधात संसदेत प्रश्न विचारल्याचा आरोप केला होता. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना लिहिलेल्या पत्रात दुबे यांनी म्हटले आहे की, ‘महुआ यांनी सभागृहात आतापर्यंत ६१ प्रश्न विचारले आहेत, त्यापैकी ५० प्रश्न उद्योगपतीच्या व्यवसायाशी संबंधित आहेत’. (Cash For Query Row)
महुआ मोईत्रा यांच्या पत्रावर आचार समितीचे काय म्हणणे आहे? हे जाणून घेण्यासाठी ‘हिंदुस्थान पोस्ट’ने समितीचे अध्यक्ष विनोद सोनकर यांच्याशी संपर्क साधन्याचा प्रयत्न केला. परंतु, ते मध्यप्रदेशात निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त असल्यामुळे त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. (Cash For Query Row)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community