Rahul Gandhi यांची यंग टीम इतिहासजमा

सिंधीया, आरपीएन सिंग, जितीन प्रसाद, मिलिंद देवरा, हार्दिक पटेल, अल्पेश ठाकोर, सुश्मिता देव, प्रियंका चतुर्वेदी यांनी काँग्रेस सोडली

267
Rahul Gandhi यांच्या ‘दलित किचन’ व्हिडिओला जातिभेदाची किनार! नेटकऱ्यांनी केले ट्रोल !!
  • वंदना बर्वे

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या सरकारच्या काळात ज्या “राहुल ब्रिगेड”च्या शब्दाला केंद्रीय मंत्र्यापेक्षा जास्त मान होता ती “राहुल ब्रिगेड” आता इतिहासाच्या पानात जमा होण्याच्या मार्गावर आहे. या यंग टीमचे कॅप्टन दस्तूरखुद्द राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि सचिन पायलट (Sachin Pilot) यांना सोडलं तर दुसरा एकही सदस्य आता त्यात उरलेला नाही. थोडक्यात राहुल टीम चे सर्व खांब जमीनदोस्त झाले आहेत. (Rahul Gandhi)

मुंबईतील काँग्रेसचे दिवंगत जेष्ठ नेते मुरली देवरा यांचे चिरंजीव माजी केंद्रीय राज्यमंत्री मिलिंद देवरा (Milind Deora) यांनीही काँग्रेस (Congress) सोडली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या शिवसेनेत काल रविवारी त्यांनी पक्ष प्रवेश केला. आता दुर्बीण हातात घेऊन राहुल टीममध्ये किती नेते उरले आहेत याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला तरी शोध लागणार नाही, एवढी अधोगती राहुल ब्रिगेडची झाली आहे. राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी ज्या दिवशी भारत जोडो न्याय यात्रा सुरू केली त्याच दिवशी टीम राहुलचे सदस्य देवरा यांनी काँग्रेसचा (Congress) निरोप घेतला. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर देवरा गेल्यामुळे काँग्रेसला जबरदस्त धक्का बसला अशी चर्चा आहे. कारण ते काँग्रेसची (Congress) तिजोरी सुद्धा सांभाळत होते. थोडक्यात, राहुल टीम आता इतिहासात जमा होण्याच्या मार्गावर आहे. राजस्थानातील नेते सचिन पायलट यांना सोडलं तर राहुल टीममध्ये नाव घ्यायला सुद्धा कुणी उरलेलं नाही. राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी याच यंग ब्रिगेडच्या हातात पक्ष आणि सर्व यंत्रणा सोपविण्यासाठी ज्येष्ठ नेत्यांना बाजूला सारण्याची मोहीम उघडली होती. मात्र, हीच मंडळी राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना सोडून गेली आहे. (Rahul Gandhi)

डॉ. मनमोहन सिंग सरकारच्या काळात राहुल टीमच्या सदस्यांना राज्यमंत्री बनविण्यात आले होते. यात ज्योतिरदित्य सिंधीया, मिलिंद देवरा (Milind Deora), आर पी एन सिंग, जितीन प्रसाद यांच्यासारख्या नेत्याचे नाव घ्यावे लागेल. संपुआ सरकारच्या काळात कॅबिनेट मंत्री सुद्धा या टीम ला घाबरून राहत होते, हे विशेष. मात्र, मागील काही वर्षांत या यंग ब्रिगेडमधील आठपेक्षा जास्त तरुण चेहऱ्यांनी दुसऱ्या पक्षात प्रवेश केला आहे. काही महिन्यांवर लोकसभा निवडणुका (Lok Sabha Elections) होणार असताना देवरा यांनी पक्ष सोडला आहे. यापूर्वी, २०१९ मधील लोकसभा निवडणुकीनंतर गुजरात मधील नेते अल्पेश ठाकोर यांनी भाजपचा हात धरला. याशिवाय हार्दिक पटेल यांनीही काँग्रेस सोडून जाणे योग्य समजले. हार्दिक पटेल आणि अल्पेश ठाकोर राहुल टीमचे महत्त्वाचे सदस्य होते. (Rahul Gandhi)

(हेही वाचा – Mahindra Bolero Neo Plus : जाणून घ्या महिंद्राच्या नवीन एसयुव्हीचे फिचर्स आणि किंमतही)

टीम राहुलसाठी २०२२ हे वर्ष ठरले सर्वात अशुभ

२०२० मध्ये, ज्योतिरादित्य सिंधिया यांनी स्वतःला काँग्रेसपासून केवळ दूर केले नाही तर त्यांच्या बंडखोरीमुळे मध्य प्रदेशातील काँग्रेस (Congress) सरकार कोसळले. सिंधिया हे राहुलच्या टीममधील सर्वात महत्त्वाचे सदस्य होते. महिला काँग्रेसच्या माजी राष्ट्रीय अध्यक्षा आणि आसाममधून लोकसभेच्या खासदार सुश्मिता देव यांनीही काँग्रेस (Congress) सोडली आणि ममता दीदींच्या पक्षात प्रवेश केला. टीम राहुलसाठी २०२२ हे वर्ष सर्वात अशुभ ठरले असे म्हणावे लागेल. पंजाबमध्ये सुनील जाखड, गुजरातमध्ये हार्दिक पटेल आणि उत्तर प्रदेशमध्ये आरपीएन सिंग यांनी काँग्रेस (Congress) सोडली. त्याच वर्षी पक्षाचे तीन ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल, गुलाम नबी आझाद आणि अश्विनी कुमार यांनीही पक्षाचा राजीनामा दिला आणि त्यांची नवी राजकीय खेळी सुरू केली. याच चार वर्षात राहुल, जितिन प्रसाद आणि अनिल अँटनी या टीममधील महत्त्वाच्या सदस्यांनीही पक्षापासून दुरावले. (Rahul Gandhi)

याशिवाय, शिवसेना (उद्धव ठाकरे) च्या विद्यमान खासदार प्रियंका चतुर्वेदी या सुद्धा काँग्रेसमध्येच होत्या. अशोक तंवर हे हरियाणा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होते. यांनी सुद्धा काँग्रेस सोडली. सिंधीया संपुआ सरकार-१ मध्ये ऊर्जा मंत्री (स्वतंत्र प्रभात) होते. आर पी एन सिंग गृह मंत्रालय आणि कॉर्पोरेट मंत्रालयाचे राज्यमंत्री होते. जितीन प्रसाद मनुष्य बळ विकास मंत्रालय आणि रस्ते व परिवहन या दोन मंत्रालयाचे राज्यमंत्री होते. मिलिंद देवरा माहिती व तंत्रज्ञान मंत्रालय आणि शिपिंग मंत्रालयाचे राज्यमंत्री होते. मात्र या सर्व यंग टीमने काँग्रेस (Congress) सोडण्याचा निर्णय घेतला. आपली यंग टीम उध्वस्त का झाली? याचं उत्तर फक्त राहुल गांधी देऊ शकतात. (Rahul Gandhi)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.