उबाठा गटाचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांना शिवसेनेच्या वतीने नोटीस बजावण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी वकिलांच्या माध्यमातून संजय राऊतांना (Sanjay Raut) ही मानहानीची नोटीस पाठवली आहे.
(हेही वाचा – डॉ. आंबेडकरांचा फोटो फाडणाऱ्या आव्हाडांना Prakash Ambedkar यांनी सुनावले; ‘असा दिखावा उपयोगाचा नाही’)
काय आहे टीका ?
खासदार संजय राऊत यांनी सामना दैनिकामध्ये लिहिलेल्या रोखठोक सदरातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले होते. एकनाथ शिंदे यांनी अजित पवार यांच्या विरोधात कट कारस्थाने केल्याचा आरोप देखील यामध्ये करण्यात आला होता. विचारांवर चालणारा महाराष्ट्र निवडणूक पैशांच्या धुरळ्यावर चालला, लोकांनी पैसे घेतले भ्रष्टाचारातून निर्माण झालेले सरकारने शेवटी जनतेला भ्रष्ट केले, असा आरोप देखील संजय राऊत यांनी त्यांच्या रोखठोक या सदरातून केला होता. एकनाथ शिंदे यांनी लोकसभा निवडणुकीत पैशाचा अफाट वापर केला, असल्याचा आरोपही यात करण्यात आला. प्रत्येक मतदारसंघात त्यांनी किमान 25 ते 30 कोटी रुपये वाटले असल्याचा गंभीर आरोप यात करण्यात आला आहे.
या प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संजय राऊत यांना माफी मागण्यास सांगितले आहे. या नोटिसीनुसार संजय राऊत यांना माफी मागण्यासाठी तीन दिवसांची मुदत देण्यात आली आहे. माफी मागितली नाही, तर कारवाईला सामोरे जा, असा इशारा देखील यामध्ये देण्यात आला आहे. यावर संजय राऊत यांनी देखील ‘अब आयेगा मजा’ असे प्रत्युत्तर दिले आहे.
50 खोके एकदम ओके।
इसे कहते है ऊलटा चोर कोतवाल को डाटे।
गैरसंविधानिक मुख्यमंत्री श्रीमान शिंदे ने हमे एक legal notice भेजी है.very intresting and one of the funny political document.
अब आयेगा मजा!!
जय महाराष्ट्र!
@mieknathshinde
@AUThackeray
@ECISVEEP pic.twitter.com/9CkFigfith— Sanjay Raut (@rautsanjay61) May 29, 2024
’50 खोके एकदम ओके। इसे कहते है ऊलटा चोर कोतवाल को डाटे। गैरसंविधानिक मुख्यमंत्री श्रीमान शिंदे ने हमे एक legal notice भेजी है. very intresting and one of the funny political document. अब आयेगा मजा!! जय महाराष्ट्र !’, असे X या सोशल मीडियावर पोस्ट केले आहे.
उद्धव ठाकरे यांच्या गटाचे मुखपत्र असलेल्या सामनामधील रोखठोकमधून संजय राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अनेक आरोप केले होते. या आरोपामुळे आपल्यला नोटीस पाठवण्यात आली असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
Join Our WhatsApp Community