काही दिवसांपूर्वी आम आदमी पक्षाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पदवीबद्दल विचारणा केली होती. त्यावरून त्यांच्यावर टीकादेखील करण्यात आली. तेव्हाच आम आदमी पक्षाकडून ‘तुमची पदवी दाखवा’ असे म्हणत एक मोहीम राबवण्यात आली. मात्र आता मिळालेल्या माहितीनुसार आम आदमी पक्षातील जवळपास २९ आमदार हे विनापदवीधार असल्याचे उघड झाले आहे. ‘आप’चे तब्बल २९ आमदार हे नववी आणि बारावी देखील शिकलेले नाहीत.
‘तुमची पदवी दाखवा’ या ‘आप’च्या मोहिमेला गुजरातच्या उच्च न्यायालयाकडून आरटीआय कायद्याचा गैरवापर करण्यावरून २५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता. त्यानंतर दिल्लीच्या शिक्षण मंत्री आतिशी यांनी त्यांची पदवी आणि पदव्युत्तर पदवी जाहीर केली. तसेच ‘तुमची पदवी दाखवा’ या मोहिमेचा प्रचार करण्यासाठी रोज आम आदमी पक्षाचे नेते आपली पदवी दाखवतील असे विधान देखील केले.
(हेही वाचा उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदाच्या राजीनाम्यावर शरद पवार पुन्हा म्हणाले…)
त्यानुसार दिल्ली विधानसभेच्या ‘आप’च्या आमदारांची संख्या पाहिली तर सलग ६२ दिवस ही मोहीम सुरु राहणं अपेक्षित होत, कारण विधानसभेत ‘आप’चे एकूण ६२ आमदार आहेत. मात्र ही मोहीम केवळ ३३ दिवसांमध्ये संपली. यावरूनच आपचे २९ आमदार हे नववी आणि बारावी देखील शिकलेले नाहीत हे सिद्ध झाले.
Join Our WhatsApp Community