निवडणूक कामांसाठी डॉक्टर्स, नर्सेस तसेच शिक्षकांना जुंपले जात असून याचा समाचार मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आपल्या भाषणात घेत या अत्यावश्यक सेवांमधील कर्मचाऱ्यांवर अशाप्रकारची जबाबदारी टाकू नये असे सांगितले. तसेच जे डॉक्टर्स, नर्सेस तसेच शिक्षक हे निवडणूक कामांसाठी नियुक्त केले गेले असतील त्यांनी त्वरित आपल्या जागी जात रुग्णांची सेवा करावी, जर तुम्हाला कुणी नोकरीवरून काढले तर मी बघतोच असा इशारा राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी दिला आहे. (Raj Thackeray)
छत्रपती शिवाजी महाराज मैदानावरील गुढीपाडवा मेळाव्यात बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी महापालिकेची निवडणूक आता होईल, आता होईल असे असतानाही अद्याप झालेली नाही. २०१९च्या विधानसभा निवडणुकीनंतर प्रथमच ही निवडणूक होत आहे. या निवडणूक कामांसाठी महापालिकेच्या रुग्णालयांमधील डॉक्टर्स, नर्सेस तसेच इतर वैद्यकीय कर्मचारी जुंपला गेला आहे. हा डॉक्टर काय मतदारांची नाडी तपासणार आहे की नर्स रुग्णांचे डायपर बदलणार आहेत असा सवाल करत राज ठाकरे यांनी यांची सेवा रुग्णांसाठी नाही का असाही प्रतिसवाल केला आहे. (Raj Thackeray)
(हेही वाचा – Bala Nandgaonkar : हिंदुत्वासाठी महायुतीत जाण्याचा आनंदच – मनसे नेते बाळा नांदगावकर)
निवडणूक होणार आहे हे माहित आहे तर मग समांतर यंत्रणा का तयार केली जात नाही? डॉक्टर्स आणि नर्सेसची रुग्णालयात आवश्यकता आहे. त्यांच्यावर निवडणुकीची जबाबदारी टाकली जाऊ नये, त्यांना रुग्णांची सेवा करु द्या असे सांगत राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी डॉक्टर्स, नर्सेस तसेच शिक्षकांना आपल्या जागी जाऊन काम करा असे आवाहन केले आहे. तसेच जर तुम्हाला नोकरीवरून काढून टाकले तर मी बघतोच, हा राज ठाकरे (Raj Thackeray) आहे, असे ते म्हणाले. (Raj Thackeray)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community