Santosh Deshmukh हत्येच्या चौकशीसाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती

चौकशी पथकात ९ अधिकारी-कर्मचाऱ्यांचा समावेश

81
Santosh Deshmukh हत्येच्या चौकशीसाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती
  • प्रतिनिधी

मस्साजोगचे (ता. केज, जि. बीड) सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्येची चौकशी करण्यासाठी गठित करण्यात आलेल्या विशेष चौकशी पथकात (एसआयटी) पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या पथकात पोलीस उप अधीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक यांचा समावेश आहे. पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीमुळे देशमुख हत्येच्या चौकशीला वेग येणार आहे.

(हेही वाचा – Biometric Attendance : मुंबई महापालिकेत बायोमेट्रिक हजेरी बंद, नवीन फेशियल बायोमेट्रिक हजेरी सुरु)

संतोष देशमुख (Santosh Deshmukh)  यांच्या निर्घृण हत्येचे प्रकरण सध्या राज्यभरात गाजत आहे. देशमुख यांच्या मारेकऱ्यांना आणि सूत्रधाराला अटक करावी, या मागणीसाठी बीड जिल्ह्यात मोठा मोर्चा काढण्यात आला होता. नागपूर येथे पार पडलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात देशमुख यांच्या हत्येचा मुद्दा गाजला होता. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी स्थापन करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार गृह विभागाने २४ डिसेंबरच्या शासन निर्णयाद्वारे पुणे येथील आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपमहानिरीक्षक डॉ. बसवराज तेली यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी नेमली आहे.

(हेही वाचा – महाराष्ट्रातून माओवाद हद्दपार होईल; CM Devendra Fadnavis यांचा विश्वास)

या एसआयटी पथकात बीडच्या गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस उप अधीक्षक अनिल गुजर, बीड स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजयसिंग जोनवाल, पोलीस उपनिरीक्षक महेश विघ्ने, पोलीस उपनिरीक्षक आनंद शिंदे यांच्यासह केज पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार, पोलीस नाईक आणि पोलीस शिपायांचा समावेश करण्यात आला आहे. एसआयटीला आवश्यक मनुष्यबळ मिळाल्याने देशमुख यांच्या हत्येच्या चौकशीला गती मिळणार आहे. (Santosh Deshmukh)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.