नीति आयोगाच्या धर्तीवर राज्यात ‘मित्र’ संस्था; मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

101

नीति आयोगाच्या धर्तीवर राज्यात ‘महाराष्ट्र इस्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन म्हणजेच मित्र ही संस्था स्थापन करण्यास गुरुवारी मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. मित्र ही संस्था राज्य शासनाला दर्जेदार सल्ला व धोरणात्मक मार्गदर्शन करणार आहे.

( हेही वाचा : चंद्रपूरात वाघाच्या हल्ल्यात तीन दिवसांत तीन जणांचा मृ्त्यू )

त्याशिवाय महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील गट- ब (अराजपत्रित), गट-क व गट-ड पदभरतीसाठी परीक्षा टीसीएस, आयबीपीएसची मदत घेतली जाणार आहे. त्यामुळे या माध्यमातून 75 हजार पदे भरण्याचा मार्ग सुकर झाला आहे.

ऐच्छिकरित्या वाहनांचे स्क्रॅपिंग करणाऱ्यांना व्याज व दंडमाफ करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे भंगार स्थितीतील वाहनांचा प्रश्न सुटणार. त्याचप्रमाणे ५ जी तंत्रज्ञानासाठी पायाभूत सुविधा वेगाने वाढविण्यासाठी दूरसंचार पायाभूत सुविधा धोरण ठरविण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.

मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय

  • मराठवाडा, विदर्भ,उत्तर महाराष्ट्रात अल्पसंख्याक महिलांचे 2800 बचत गट निर्माण करणार. 1500 महिलांना कौशल्य विकास प्रशिक्षण.
  • भू विकास बँकेचे कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी. एकूण 964 कोटी 15 लाख रुपयांची कर्जमाफी. भूविकास बँकेच्या मालमत्तांचे शासनाकडे हस्तांतरण करणार
  • “महाराष्ट्र ॲग्रीबिझनेस नेटवर्क” (MAGNET) संस्थेस अनुदान स्वरुपात निधी देणार. शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करणे शक्य
  • राजकीय आणि सामाजिक आंदोलनातील 30 जून 2022 पर्यंतचे खटले आता मागे घेणार.
  • माहिती तंत्रज्ञान तज्ञ विभागातील राजपत्रित पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यकक्षेतून वगळणार
  • बुलडाणा जिल्ह्यातील अरकचेरी आणि आलेवाडी बृहत लघु पाटबंधारे प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता. 1918 हेक्टर जमिनीला सिंचनाचा फायदा
  • राज्य मालमत्ता पुनर्रचना कंपनीचे भागभांडवल 311 कोटी करणार.
  • महाराष्ट्र आकस्मिकता निधीच्या मर्यादेत 200 कोटींची तात्पूरती वाढ करण्याचा निर्णय.
  • 1250 मे टन प्रतिदिन गाळप क्षमता 2500 मे.टन पर्यंत वाढविण्यासाठी शासकीय भागभांडवल देणार.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.