खो खो हा खेळ लहानपणी आपण सगळेच खेळलो आहोत. बसलेल्या मुलाला खो दिला तर तो मुलगा धावू लागतो आणि पळणार्या मुलाला पकडू लागतो. मग धावणारा मुलगा परत दुसर्याला खो देतो. कॉंग्रेसने गेली दोन दशके हेच सुरु आहे. कॉंग्रेस हा खो-खो खेळणार्यांचा पक्ष झालेला आहे. पण यात खेळाडू दोनच आहेत. माता अम्पायर आणि स्पाऊंसर आहे आणि बाकीचे टाळ्या वाजवणारे सामान्य प्रेक्षक.
( हेही वाचा : मुंबईच्या महाराजाची वर्ल्ड रेकॉर्ड इंडियामध्ये नोंद)
प्रेक्षक म्हणजे सर्व कॉंग्रेस-जन, अम्पायर आणि स्पाऊंसर म्हणजे सोनिया गांधी आणि दोन खेळाडू म्हणजे राहुल गांधी आणि प्रियंका वाड्रा. कॉंग्रेसमध्ये एक नियम आहे आणि तो नियम म्हणजे सोनिया गांधी यांनी बनवलेला नियम पाळायचा असतो. सोनिया गांधींनी जबरदस्त योजना आखून कॉंग्रेस हस्तगत केली आहे. आता ही कॉंग्रेस टिळक किंवा महात्मा गांधींची राहिलेली नाही. ही कॉंग्रेस राजमातेची झालेली आहे.
क्रित्येक कर्तृत्ववान कॉंग्रेसच्या लोकांना डावलून राहुल गांधी आणि प्रियंका वाड्राला नेतृत्व दिलं जात आहे. बरं, लोकांनी या दोघांना सपशेल नाकारलं आहे. मग राहुल गांधी मध्येच जनेऊधारी ब्राह्मण बनतात, तर कधी आपले कैलासवासी पिता राजीव गांधी यांचा गेट-अप धारण करतात, तर मध्येच ते युवा नेते होतात. वेळीच त्यांचं लग्न झालं असतं तर त्यांना आता युवा मुलं असती. असो…
प्रियंका वाड्राच्या बाबतीत देखील हीच कथा. प्रियंका वाड्रा यांच्यात कॉंग्रेसच्या लोकांना कधी देवी दिसते तर कधी त्यांचं नाक त्यांच्या आजीसारखं दिसतं म्हणून इंदिरा गांधींनीच पुनर्जन्म घेतल्याचा साक्षीदार त्यांना होतो. कॉंग्रेसच्या लोकांइतके अंधश्रद्धाळू आणि प्रतिगामी दुसरं कुणी नाही. त्यांच्या समोर परफॉर्मेन्स असताना देखील ते गांधी कुटुंबाची भक्ती करायची सोडत नाही. गांधी कुटुंबाला लोकांनी केव्हाच ’चले जाओ’ म्हटलेलं आहे. पण ह्यांचं मात्र गांधी लाओ सुरु आहे. बरं, ह्या गांधींचा आणि महात्मा गांधींचा काडीचाही संबंध नाही.
मानसिक गुलामीच्या आहारी गेल्यामुळे कॉंग्रेस पक्षाची वाताहत झालेली आहे. कधी राहुल तर कधी प्रियंका एकमेकांना खो देतात, तसे त्यांच्यापैकी कुणीतरी मैदानात उतरलं आणि हरल्यावर परत जातात. हा खो खो खेळ सुरुच आहे. हा खेळ थांबला नाही तर पक्षालाच कुणीतरी खो देईल.
Join Our WhatsApp Community