शिंदे-फडणवीस सरकारने ज्या योजना राबविल्या त्या बेकायदेशीर आहेत का? प्रविण दरेकरांचा उद्धव ठाकरेंना सवाल

205
शिंदे-फडणवीस सरकारने ज्या योजना राबविल्या त्या बेकायदेशीर आहेत का? प्रविण दरेकरांचा उद्धव ठाकरेंना सवाल

‘मोदी@९’ महाजनसंपर्क अभियानांतर्गत राज्यभरात कार्यक्रम सुरू आहेत. या अभियानाच्या पार्श्वभूमीवर सोमवार २६ जून रोजी राजापूर येथे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या उपस्थितीत जाहीर सभा पार पडली. या सभेत बोलताना अभियानाचे मुख्य संयोजक भाजपा विधानपरिषदेचे गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी ठाकरे गटावर तोफ डागली. ठाकरे गटाचे नेते शिंदे-फडणवीस सरकार बेकायदेशीर असल्याचे वारंवार बोलतात. मग ह्या सरकारने राबविलेल्या योजना बेकायदेशीर आहेत का? असा खरमरीत सवालच दरेकर यांनी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांना विचारला आहे.

याप्रसंगी भाजपा मुंबई अध्यक्ष आमदार आशिष शेलार, आमदार नितेश राणे, अतुल काळसेकर, जिल्हाध्यक्ष राजन तेली, दीपक पटवर्धन, माजी आमदार बाळ माने, ऐश्वर्या जठार, माजी आमदार प्रमोद जठार आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना दरेकर म्हणाले की, या अभियानाच्या निमित्ताने मी मराठवाडा, विदर्भात फिरलो. उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र करत आपल्याकडे आलो, असे एकही ठिकाण नाही की भाजपचा सभेला हजारोंचा जनसमुदाय उपस्थित नाही, अशी एकही सभा झाली नाही. सुरुवातीला नांदेडला सभा झाली केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आले होते. तुडुंब असा जनसमुदाय होता. का लोकं जमाताहेत? लोक एवढ्यासाठी जमताहेत की ९ वर्षापूर्वी मोदी यांना या देशातील जनतेने मतदान केले. या ९ वर्षाच्या कालावधीत जे ४०-४५ वर्ष काँग्रेसला जमले नाही ते देण्याचा प्रामाणिक प्रयत्न पंतप्रधान मोदींच्या माध्यमातून झाला. या ९ वर्षात मुद्रा योजनेच्या माध्यमातून ४१ लाख लोकांना कर्ज उपलब्ध करून स्वतःच्या पायावर उभे करण्याची संधी दिली. युवकांसाठी स्टार्ट अप योजना आणली. आयुष्यमान भारतच्या माध्यमातून जवळपास ७१ लाख गरिबांना त्याचा लाभ झाला. कोरोना काळात १७ कोटी ७९ लाख लसी महाराष्ट्रात मोदींच्या नेतृत्वाखाली दिल्या गेल्याचेही दरेकर यांनी सांगितले.

(हेही वाचा – राज्यात मुसळधार : मुंबई, ठाणे, कोकण आणि विदर्भाला सतर्कतेचा इशारा)

दरेकर पुढे म्हणाले की, विरोधी पक्ष आमच्यावर वेगवेगळे आरोप करत आहेत. उध्दव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत असतील, सातत्याने हे खोके सरकार आहे, हे घटनाबाह्य सरकार आहे, हे बेकायदेशीर सरकार आहे, असे म्हणतात. माझी त्यांना विचारणा आहे ज्या योजनांनी गेल्या १० वर्षाच्या कालावधीत जे प्रकल्प दिले, विकासकामे दिली वेगवेगळ्या समाजघटकांना जो लाभ मिळतो तो बेकायदेशीर आहे का? याचे उत्तर संजय राऊत आणि उध्दव ठाकरे तुम्हाला द्यावे लागणार आहे. केंद्र आणि राज्य सरकार मिळून शेतकऱ्यांच्या खात्यात ६-६ हजार रुपये देत आहे. ते बेकायदेशीर आहेत का? हे शेतकऱ्यांना सांगा. महिला अर्ध्या तिकितात ऐसटीतून प्रवस करत आहेत ते बेकायदेशीर आहे का? याचा जाब तुम्हाला द्यावा लागणार आहे. महात्मा फुले जन आरोग्याच्या माध्यमातून ५ लाखांचा लाभ सर्वसामान्य रुग्णांना देतो तो कायदेशीर आहे याचे उत्तर संजय राऊत आपल्याला द्यावे लागणार आहे. शेतकऱ्याला एक रुपयात विमा दिला तो कायदेशीर की बेकायदेशीर हेही संजय राऊत आपल्याला सांगावे लागणार आहे, १४ मेडिकल कॉलेजना राज्यात मान्यता दिली ती बेकायदेशीर आहे का? धनगर समाजासाठी १० हजार कोटीची तरतूद केली हे सर्व बेकायदेशीर आहे का? याचे उत्तर संजय राऊत, उध्दव ठाकरे आम्ही तुम्हाला विचारतोय.

दरेकर पुढे म्हणाले की, कोकणच्या विकासाची सुरुवात खऱ्या अर्थाने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या नेतृत्वाने झाली. कोकणचा जो काही कायापालट झाला त्याची सुरुवात राणे यांच्या नेतृत्वाखाली झाली. परंतु नंतरच्या काळात कोकणला शिवसेनेने काही दिले नाही. राणे यांच्यानंतर कोकणला देवेंद्र फडणवीस यांनी दिले, आमच्या सरकारने दिले. आमचे मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून कोकणच्या विकासाला गती मिळतेय.

संजय राऊतांनी मराठीचा ठेका घेतला आहे का ?

दरेकर म्हणाले की, संजय राऊत म्हणाले अमित शहा आणि पंतप्रधान मोदी हे मराठीचे शत्रू आहेत. मला यांना सांगावेसे वाटते तुम्ही म्हणजे मराठी आहात का? मराठीचा तुम्ही ठेका घेतला आहे का? आम्ही कोण आहोत. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केले आहे, बाळासाहेबांच्या सैनिकाला मुख्यमंत्री केलेय. तो काय पाकिस्तानातून आला आहे का? मुंबई तोडायची आहे असा आरोप करता मुंबई काय तुझी जहागीर आहे का? असा सवालही यावेळी दरेकर यांनी उपस्थित केला.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.