राज्याच्या सत्तासंघर्षावरील सुनावणीला सर्वोच्च न्यायालयात सुरूवात झाली आहे. एकनाथ शिंदेंकडून वकील हरीश साळवे यांनी प्रथम युक्तिवाद केला यानंतर नीरज कौल यांचा युक्तिवाद झाला. सध्या महेश जेठमलानी युक्तिवाद करत आहेत.
( हेही वाचा : जुनी की नवी पेन्शन योजना? जाणून घ्या नेमका फरक काय आहे?)
नीरज कौल यांच्या युक्तिवादातील महत्त्वाचे मुद्दे
- राजकीय पक्षाचे अस्तित्व हे विधिमंडळ पक्षावर अवलंबून असते.
- सत्तासंघर्ष प्रकरणात तयार झालेला वेगळा गट हाच खरा पक्ष आहे निवडणूक आयोगानेही त्याला शिवसेना अशी मान्यता दिली आहे. यावेळी घटनापीठाकडून नीरज कौल यांच्या युक्तिवादावर सवाल करण्यात आला. तुमचे म्हणणे मान्य केले तर विधानसभा अध्यक्षांच्या मदतीने कुणीही पक्ष ताब्यात घेऊ शकतो का?
- यावर नीरज कौल म्हणाले की, सांविधानिक संस्था बाजूला ठेऊन सर्वोच्च न्यायालय निर्णय घेऊ शकत नागी. विधानसभेतील गटनेताच पक्षाची भूमिका ठरवू शकतो. विधानसभा अध्यक्षांना आमदारांच्या अपात्रतेचा अधिकार आहे तर राज्यपालांना बहुमत चाचणीचा अधिकार आहे. निवडणूक आयोगाला पक्ष कुणाचा हे ठरवण्याचा अधिकार आहे. या सर्व सांविधानिक यंत्रणा बाजूला ठेऊन आम्ही निर्णय घेतो असे सर्वोच्च न्यायलय म्हणेल का? असा युक्तिवाद नीरज कौल यांनी केला.
- राज्यपालांनी आपल्या अधिकारात बहुमत चाचणीचा निर्णय घेतला. समोर जी परिस्थिती आहे त्यानुसार राज्यपालांनी बहुमत चाचणी बोलावली.
- राज्यपालांनी बहुमत चाचणीला सामोरे जा, असे उद्धव ठाकरेंना सांगितले होते. मात्र, बहुमत नसल्यामुळे उद्धव ठाकरेंनी आधीच राजीनामा दिला. सरकारला बहुमत नसल्यामुळे राज्यपाल अशा पद्धतीने अधिवेशन बोलावू शकतात. राज्यपालांचा तो अधिकार आहे.
- यावर राज्यपालांनी असे निर्णय मागच्या काही काळात घेतले का? असा सवाल घटनापीठाने केला आहेय
- हे मला शोधावे लागेल. मात्र असे प्रकरण नाही असे गृहीत धरू, असे कौल यांनी घटनापीठाला सांगितले.