“हिऱ्यासारखी लोक ठाकरेंना सांभाळता आली नाही”, Arjun Khotkar यांचा हल्लाबोल

99
"हिऱ्यासारखी लोक ठाकरेंना सांभाळता आली नाही", Arjun Khotkar यांचा हल्लाबोल

उद्धव ठाकरे (uddhav Thackeray) यांचे एकनिष्ठ असलेले राजन साळवी (Rajan Salvi) यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. या पार्श्वभूमीवर शिंदेंचे आमदार अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. “उद्धव साहेबांना हिऱ्यासारखी माणसं सांभाळता आली नाहीत, हे दुर्दैव आहे,” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. (Arjun Khotkar)

हेही वाचा-Manipur मध्ये CRPF जवानाने केली दोन सहकाऱ्यांची हत्या; स्वतःवरही झाडली गोळी, ८ जखमी

राजन साळवी यांच्या शिंदे गटात प्रवेशावर प्रतिक्रिया देताना अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) म्हणाले, “उद्धव साहेबांना सोडून जाण्याचा प्रश्न नाही. त्यांनी विचारधारा बदलली आहे. आम्ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिक आहोत. त्यांच्यानंतर कमान उद्धव ठाकरे यांच्या हातात आली होती. पण त्यांनी हिऱ्यासारखी माणसं सांभाळली नाहीत, हे दुर्दैव आहे.” (Arjun Khotkar)

हेही वाचा-Mumbai 26/11 attacks : मुंबई हल्ल्यातील दहशतवादी तहव्वूर राणाला भारताकडे सोपवणार; ट्रम्प यांची घोषणा

“उद्धव साहेबांना सोडताना आम्हाला देखील दुःख झाले होते. मी असो किंवा एकनाथ शिंदे असोत, आम्ही आनंदाने शिवसेना सोडली नव्हती. आम्हाला वेदना झाल्या, पण पक्षातील बदलांमुळे हा निर्णय घ्यावा लागला. शिवसेनेत एक चांगली गोष्ट घडली आहे. खरी शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पुढे जात आहे. साहजिकच, ज्यांनी पारंपरिक शिवसेनेत वर्षानुवर्षे काम केले आहे, त्यांना हे कठीण जाणवणारच” (Arjun Khotkar)

हेही वाचा-PM Narendra Modi व डोनाल्ड ट्रम्प यांच्यात द्विपक्षीय चर्चा ; भेटीत नेमकं काय घडलं ?

आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या दिल्ली दौऱ्याबद्दल बोलताना खोतकर म्हणाले, “आता सूचना देऊन काय उपयोग? पाणी वाहून गेले आहे. डॅमेज कंट्रोलच्या बाहेर परिस्थिती गेली आहे. आता काही होणार नाही. आदित्य ठाकरे यांनी स्वतःच आता ‘ज्यांना जायचे ते जावे’ असे सांगितले आहे. याचा अर्थ त्यांच्या हातातून सर्व काही निसटले आहे.” (Arjun Khotkar)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.