Arjun Munda : विधानसभा निवडणुकीनंतर अर्जुन मुंडा यांच्यावर कृषिमंत्री पदाची जबाबदारी

232
Arjun Munda : विधानसभा निवडणुकीनंतर अर्जुन मुंडा यांच्यावर कृषिमंत्री पदाची जबाबदारी

नरेंद्र तोमर यांनी खासदारपदाचा राजीनामा दिल्यानंतर केंद्रीय आदिवासी व्यवहार (Arjun Munda) मंत्री अर्जुन मुंडा यांच्याकडे कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाचाही कार्यभार सोपवण्यात आला आहे.

अर्जुन मुंडा (Arjun Munda) हे यापूर्वी तीन वेळा झारखंडचे मुख्यमंत्री होते आणि मे २०१९ मध्ये त्यांची केंद्रीय आदिवासी व्यवहार मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

(हेही वाचा –  Muslim : हिंदू धर्मात आल्यावर स्वातंत्र्य मिळाल्यासारखे वाटतेय; सुफियाने हिंदू बनल्यावर दिली प्रतिक्रिया  )

सविस्तर माहितीनुसार, गुरुवार ७ डिसेंबर रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सल्ल्यानुसार नरेंद्र तोमर यांचा राजीनामा स्वीकारला आणि अर्जुन मुंडा (Arjun Munda) यांना त्यांच्या विद्यमान खात्याव्यतिरिक्त कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाचा कार्यभार सोपवला. अन्य तीन राज्यमंत्री-राजीव चंद्रशेखर, शोभा करंदलाजे आणि भारती प्रवीण पवार यांनाही अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे.

याचवेळी भाजप नेते प्रल्हाद सिंग पटेल आणि रेणुका सिंग सरुता यांचे केंद्रीय मंत्रिमंडळातील राजीनामेही राष्ट्रपतींनी स्वीकारले. मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत प्रल्हाद पटेल यांनी नरसिंहपूर मतदारसंघातून तर रेणुका सिंग यांनी छत्तीसगडमधील भरतपूर-सोनहाट विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला. (Arjun Munda)

(हेही वाचा – Nagpur Winter Session 2023 : अधिवेशनाचा दुसरा दिवस कसा रंगणार?)

मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमधील नव्या सरकारांमध्ये ते सामील होऊ शकतात अशा तीव्र संकेतांच्या पार्श्वभूमीवर, नुकत्याच राज्य विधानसभांमध्ये निवडून आलेले त्यांचे सर्व खासदार संसद सोडतील असा निर्णय भाजपने घेतल्यामुळे केंद्रीय मंत्र्यांनी राजीनामे दिले आहेत. (Arjun Munda)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.