औरंगजेबाची कबर हटवता येत नसेल, तर त्या थडग्यावर थुंकण्याची व्यवस्था करावी, असे केल्यास तेथील पर्यटन वाढेल, अशी मागणी भाजप नेते सुनील देवधर (Sunil Deodhar) यांनी सरकारकडे केली आहे. या मागणीनंतर नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
औरंगजेबाची कबर हटवा अन्यथा बाबरीसाठी कारसेवा करू, असा इशारा विश्व हिंदू परिषदेसह बजरंग दलाने दिल्यानंतर तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे या कबरीच्या भोवती आता सुरक्षा वाढवण्यात आली आहे. तसेच कबरीजवळ जाण्यासाठी प्रतिबंध करण्यात आला आहे.
(हेही वाचा अश्लिलता पसरवणाऱ्या 18 OTT platform वर बंदी)
सुनील देवधर काय म्हणाले?
महाराष्ट्रातील देवाभाऊंचे सरकार कायद्याचे आहे. त्यामुळे कायद्याचे राज्य आहे. म्हणून कायदा हातात घेऊन कुठलीही गोष्ट केली जाणार नाही. औरंगजेबासारख्या क्रुरकर्माच्या कबरीचे काही औचित्य नाही. ती उघडून टाकली पाहिजे, याच्याशी मी सहमत असल्याचे सुनील देवधर म्हणाले. मात्र, जर ती कबर उघडता येत नसेल, तर औरंग्याच्या थडग्यावर थुंकण्याची व्यवस्था करा. लोक येतील त्याच्यावर थुंकतील, तिथले पर्यटन वाढेल, असे सुनिल देवधर (Sunil Deodhar) म्हणाले.
Join Our WhatsApp Community