अनिल देशमुखांना दिसता क्षणी अटक! अखेर कुणी दिले आदेश?

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ५ वेळा समन्स पाठवून ईडीने त्यांना चौकशीसाठी बोलावले, मात्र ते गैरहजर राहिले.

129

१०० कोटींच्या वसुली आरोपप्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मागे सीबीआय आणि ईडी या दोन्ही तपास यंत्रणांच्या चौकशीचा ससेमिरा लागला आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ५ वेळा समन्स पाठवून ईडीने त्यांना चौकशीसाठी बोलावले, मात्र ते गैरहजर राहिले. त्यामुळे अखेर ईडीने त्यांच्या विरोधात लूकआऊट नोटीस जारी केली आहे. त्यामुळे देशमुख यांना दिसता क्षणी अटक होणार असल्याने त्यांच्या अडचणीत बरीच वाढ झाली आहे.

सीबीआय अहवाल फोडल्याचे प्रकरणही अंगलट येणार!

देशमुख आणि त्यांचे कुटुंबीय ईडीच्या नोटीसची दखल घेत नाहीत, त्यामुळे अखेर ईडीने हा अंतिम निर्णय घेतला आहे. १०० कोटींच्या वसुलीच्या आरोपामुळे देशमुख पुरते अडकले आहे. एकाच वेळी त्यांच्या मागे सीबीआय आणि ईडीच्या चौकशीचा ससेमिरा लागला आहे. ईडीच्या लूक आऊट नोटिसीमुळे अनिल देशमुख यांना देश सोडून जाता येणार नाही. तसेच देशमुख जिथे दिसतील, त्याच क्षणी अटक करण्याचे आदेश सुद्धा ईडीने काढले आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी अनिल देशमुख प्रकरणाचा तपास सीबीआय, ईडी करत असतानाच काही दिवसांपूर्वी सीबीआयचा चौकशी अहवाल फुटल्याचे प्रकरण उघडकीस आले आणि देशमुखांना क्लीन चिट मिळाल्याचा दावा करण्यात आला. या प्रकरणी सीबीआयने कारवाई करत सीबीआयचाच अधिकारी अभिषेक तिवारी याला बेड्या ठोकल्या. त्यानंतर याच प्रकरणात देशमुखांचा वकील डागा यालाही अटक केली. अभिषेक तिवारी याने आयफोनसाठी हा चौकशी अहवाल लीक केला असल्याची माहिती समोर आली.

(हेही वाचा : आता ‘हिजाब जिहाद’ची सुरुवात? वाचा काय आहे षडयंत्र)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.