स्वरा भास्करला अटक करा! का सुरु झाला ट्विटर ट्रेंड? 

तालिबानी दहशतवाद्यांनी अफगाणिस्तानावर हल्ला करून अफगाणिस्तानची सत्ता काबीज केल्यानंतर भारतात मात्र निधर्मीयतेचा बुरखा पांघरून हिंदुद्वेष पसरवणाऱ्या तथाकथित पुरोगाम्यांनी मौन बाळगले. त्यामुळे सोशल मीडियातून त्यांच्यावर टीकाटिपण्णी होऊ लागली. अखेर न राहून अभिनेत्री स्वरा भास्कर हिने मतप्रदर्शन करताना थेट हिंदूंनाही दहशतवादी म्हणून जाहीर करून टाकले. त्यामुळे स्वरा भास्करने हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत, म्हणून तिला अटक करण्यात यावी, या मागणीसाठी #ArrestSwaraBhasker हा ट्विटर ट्रेंड सुरु झाला आहे.

(हेही वाचा : हुश्श! तालिबान्यांशी लढायला कुणीतरी आला…कोण आहे ‘तो’?

काय म्हटले आहे स्वरा भास्करने? 

आम्ही हिंदुत्ववादी दहशतवाद्यांसोबत सुरक्षित असू शकत नाही आणि आम्हाला तालिबान्यांच्या दहशतीचाही धक्का बसला आहे. आम्ही तालिबान्यांच्या दहशतीसोबत शांत राहू शकत नाही आणि आम्ही हिंदुत्ववादी दहशतवाद्यांप्रतीही संताप ठेवू. आमची मानवतावादी आणि नैतिक मूल्ये ही अत्याचारी किंवा दडपशाहीच्या ओळखीवर आधारित नसावीत.

काय म्हणतायेत नेटकरी! 

स्वरा भास्कर हिने हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. तिच्याविरोधात भा दं वि २९५ ए अंतर्गत गुन्हा दाखल करावा आणि तिला ३ वर्षे तुरुंगात पाठवा.

स्वरा भास्कर हिने हिंदूंची धार्मिक भावना दुखावली आहे. खोटे आरोप केले आहेत. धरणीक द्वेष पसरवत आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here