जो पत्रकार रिफायनरी विरुद्ध लढत होता, रिफायनरीमुळे कोकणचे कसे नुकसान होईल, शेतीचे काय होईल, प्रदूषण वाढेल असे अनेक प्रश्न घेऊन आवाज उठवत होता म्हणून शशिकांत वारिसे यांना गाडीखाली चिरडून मारलं. राजापुरात अब्जावधीचे व्यवहार कसे झाले याबाबत वारिसे यांनी लिहायला सुरूवात केली होती त्यामुळे त्या भागातील राजकारण्यांच्या डोळ्यात ते खूपत होते असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला आहे. तसेच या हत्येमागच्या सूत्रधाराला अटक झाली पाहिजे अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे.
( हेही वाचा : ठाणेकरांनो या मार्गांवर रविवारी प्रवेशबंद! हाफ मॅरेथॉनमुळे वाहतुकीत बदल)
हत्येमागच्या सूत्रधाराला अटक करा
विरोधकांना संपवण्यासाठी ईडी, सीबीआय, पोलीस आणि आयकराच्या कारवाईत अडकवले जाते. आता पुढचे पाऊल टाकले गेले आहे आणि विरोधकांच्या हत्या घडवून आणल्या जात आहेत. ही झुंडशाही, गुंडशाही आहे. आतापर्यंत अटकेच असलेल्या आरोपींनी किती हल्ले केले आणि कोणाच्या सांगण्यावरून केले हे गृहमंत्र्यांना माहिती आहे त्यामुळे हत्येमागच्या सूत्रधाराला अटक केली पाहिजे अशी मागणी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे.
Join Our WhatsApp Community