राऊतांना भेटण्यास आर्थर रोड जेलमध्ये गेलेल्या राजकीय नेत्यांना प्रशासनाने रोखले

पत्राचाळ जमीन घोटाळ्या प्रकऱणी ईडीने अटक केलेले शिवसेना खासदार संजय राऊत यांना भेटण्यासाठी गेलेल्या एका खासदार आणि दोन आमदारांना परवानगी नाकारण्यात आल्याची माहिती आर्थर रोड जेल प्रशासनाने दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेना नेत्यांना तसेच बंधू सुनील राऊत यांनाही जेल प्रशासनाने भेटीची परवानगी दिली नाही. आर्थर रोड जेल प्रशासनाने या नेत्यांना राऊतांना भेटण्यासाठी मनाई केली. बुधवारी सकाळी संजय राऊत यांचे धाकडे बंधू शिवसेना आमदार सुनील राऊत आणि शिवसेना सचिव- खासदार अनिल देसाई हे संजय राऊतांना भेटण्यासाठी जेलमध्ये गेले होते. मात्र तुरूंग प्रशासनाने त्यांना स्पष्ट शब्दात नकार दिला.

(हेही वाचा – INS Vikrant Scam: उच्च न्यायालयाचा सोमय्या पिता-पुत्राला दिलासा; अटकपूर्व जामीन मंजूर)

दरम्यान, राऊत हे पत्राचाळ प्रकरणातील एक आरोपी आहेत. ८ ऑगस्टपर्यंत त्यांना ईडीची कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर आता ईडी कोठडीची मुदत संपल्यानंतर त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली असून ते संजय राऊत हे सध्या आर्थर रोड जेलमध्ये आहेत.

राऊतांच्या वकिलाने न्यायालयात मागणी केली होती की, राऊतांना ईडीच्या कोठडीत ज्या काही परवानग्या दिल्या होत्या, त्या तुरूंगातही देण्यात याव्यात. त्यांना घरचे जेवण आणि औषध द्यावे. त्याचवेळी राऊतांचा हृदयविकाराचा त्रास असल्याने त्यांना तुरूंगाच्या कोठडीत घरचे जेवण देण्यात यावे आणि त्यांची औषधेही तुरंगात देण्यात यावी, असे न्यायालयाने म्हटले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here