Article 370 : आजोबांचे स्वप्न साकार! नातू विचारतो, काय साध्य केलं?

188
Article 370 : आजोबांचे स्वप्न साकार! नातू विचारतो, काय साध्य केलं?

काश्मीरमधील कलम ३७० हटवण्याचे स्वप्न हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी पाहिले. अखेर हे कलम ऑगस्ट २०१९ हटवून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी बाळासाहेब ठाकरे आणि अटल बिहारी वाजपेयी यांचे स्वप्न साकार केले. पण आता याच बाळासाहेबांचे नातू प्रश्न विचारत आहेत की हे कलम ३७० हटवून काय साध्य केलेत. (Article 370)

शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार, आदित्य ठाकरे यांची दक्षिण मध्य मुंबईचे लोकसभा मतदार संघाचे मविआचे उमेदवार अनिल देसाई आणि ईशान्य मुंबईचे उमेदवार संजय दिना पाटील यांच्या प्रचारार्थ प्रतिक्षानगर शीव आणि भांडुप येथे सभेचे आयोजन करण्यात आलं होतं. या प्रसंगी बोलतांना आदित्य ठाकरे म्हणाले, काश्मीर मध्ये ३७० काढले पण भाजपाला विचारा आतंकवाद संपला का? ३७० कलम हटवले पण काश्मिरी पंडिताना घर मिळाले का? हल्ले का होत आहेत? असा सवाल उपस्थित करत एकप्रकारे हे कलम हटवून काय साध्य केले अशीच विचारणा त्यांनी केली. (Article 370)

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना एका मुलाखतीमध्ये ‘आपण पंतप्रधान होणार का’ असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते की, तशी विशेष परिस्थिती तयार झाल्यास नक्कीच होईन. त्यानंतर मुलाखतकाराने त्यांना पंतप्रधान झाल्यावर कोणते पहिले काम करणार असाही प्रश्न विचारला होता. त्यावर बाळासाहेब ठाकरेंनी काश्मीर साफ करणार असल्याची प्रतिक्रिया दिली होती. बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते, “मी पंतप्रधान झाल्यावर पहिले काम काश्मीर साफ करण्याचे करेन. काश्मीरमध्ये एकही पाकिस्तान, बांगलादेशचा नागरिक राहता कामा नये. दहशतवाद्यांवर खटला न चालवता थेट गोळीबार करण्याचा आदेश देईल.” (Article 370)

(हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : एसटी बस प्रवाशांसाठी की निवडणूक कामांसाठी ?)

त्यामुळे बाळासाहेबांची स्वप्नपूर्ती देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. ऑगस्ट २०१९ मध्ये त्यांनी कलम ३७० हटवून काश्मीरचे विशेषाधिकार काढण्याची घोषणा करत त्यावर निर्णय घेतला. त्या वेळी तत्कालीन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यावर प्रतिक्रिया देताना, “आज खरोखरच ऐतिहासिक दिवस आहे. इतकी वर्षे देशातील प्रत्येक माणूस जे स्वप्न उराशी बाळगून होता ते पूर्ण झाले. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचेही स्वप्न आज पूर्ण झाले. त्यामुळे मी मनापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांचं अभिनंदन करतो, असं मत उद्धव ठाकरेंनी व्यक्त केलं होते.” (Article 370)

एवढेच नाही तर उद्धव ठाकरे असेही म्हणाले की, “पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांचे कौतुक करताना आजही आपल्या देशात पोलादीपणा कायम आहे. हे संपूर्ण जगाला दाखवून दिले आहे. तसेच १५ ऑगस्ट हा दिवस आपण स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करतो. मात्र आज (५ ऑगस्ट) आपला देश पूर्ण स्वतंत्र झाला,” असंही उद्धव ठाकरे म्हणाले होते. पान आता उद्धव ठाकरे यांचे पुत्र आणि बाळासाहेबांचे नातूच आता कलम ३७० हटवण्याबाबत प्रश्न विचारतात आहेत. (Article 370)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.