मुंबईतील लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Elections) चढत चाललेला रंग ‘डॅडी’च्या येण्याने अधिक रंगतदार होण्याची शक्यता आहे. अंडरवर्ल्ड डॉन ते माजी आमदार असा जीवनप्रवास केलेल्या अरुण गवळीला (Arun Gawli) सोडण्याचा आदेश नागपूर खंडपीठाने नुकताच दिला आहे. त्यामुळे भायखळा परिसरात विशेषतः दगडी चाळीत उत्साहाचे वातावरण असून अखिल भारतीय सेना (अभासे) पुन्हा जोमाने सक्रिय होऊ शकते. गेल्या वीस वर्षात अभासे या पक्षाने सुरुवातीला शिवसेना आणि डॅडी जेलमध्ये गेल्यानंतर भाजपाला पाठिंबा देत सोयीचे राजकारण केले. आता बाहेर आल्यानंतर डॅडीचा (Daddy) पाठिंबा कुणाला असेल भाजपा, शिवसेना (शिंदे) की शिवसेना उबाठा? (Arun Gawli)
(हेही वाचा- Onion Export Ban : कांदा निर्यात बंदीचे ४ महिने, शेतकरी चिडलेले)
गवळी (Arun Gawli) याने २००६ च्या एका शासन निर्णयाचा आधार घेत न्यायालयाकडे सुटकेसाठी अर्ज केला. या शासन निर्णयाच्या आधारे वयाची पासष्टी (६५) पूर्ण केलेल्या, शरीराने अशक्त आणि कारावासाची निम्मी शिक्षा पूर्ण केलेल्या कैदयाची सुटका करण्याची तरतूद आहे. या सर्व अटी गवळी पूर्ण करत असल्याने ६८ वर्षीय गवळीने या शासन निर्णयाचा आधार घेत नागपूर खंडपीठाकडे अर्ज केला. त्यामुळे पुढील काही दिवसांत भायखळ्याचा ‘डॅडी’ तुरुंगाबाहेर येऊ शकतो. (Arun Gawli)
सुटका होण्यास अजून २ आठवडे
मार्च २००७ मध्ये शिवसेना (Shiv Sena) नगरसेवक कमलाकर जामसांडेकर खूनप्रकरणी गवळीला जन्मठेप झाली होती आणि तो नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत होता. आता जरी त्याला सोडण्याचे आदेश न्यायालयाने दिले असले तरी त्याची सुटका गृह विभाग आणि अन्य प्रतिवाद्यांच्या ना-हरकतीवर अवलंबून असेल. त्यामुळे गवळीची सुटका होण्यास अजून किमान २ आठवडे लागतील, असा अंदाज आहे. (Arun Gawli)
(हेही वाचा- Anand Mahindra Job Offer : उद्योजक आनंद महिंद्रा यांनी १३ वर्षीय मुलीला दिली थेट नोकरीची ऑफऱ)
‘अभासे’तही फूट
दरम्यान, अभासेच्या गीता गवळी (Geeta Gawli) आणि वंदना गवळी या दोन नगरसेविका सन २००७ आणि सन २०१२ मध्ये निवडून आल्या होत्या. मात्र जामसंडेकर यांच्या हत्येचा आरोप गवळी यांच्यावर असतानाही अभासेने पाठिंबा दिला होता. त्यानंतर सन २०१७ मध्ये गीता गवळी (Geeta Gawli) या एकमेव नगरसेविका अभासेच्या निवडून आल्या. पण या निवडणुकीनंतर गीता गवळी (Geeta Gawli) यांनी भाजपला पाठिंबा दर्शवला होता. परंतु आता वंदना गवळी यांनी काही महिन्यांपूर्वी शिवसेनेत (Shiv Sena) प्रवेश केला आहे. तर गीता गवळी या अभासेमध्ये आहे. त्यामुळे अभासेमध्येच आता फुट पडलेली आगामी विधानसभा निवडणुकीत भायखळा विधानसभा क्षेत्रात अभासे आपला उमेदवार करणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आल्यास ते कुणाला पाठिंबा देणार? असाही प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे आधी शिवसेनेला आणि त्यानंतर भाजपला साथ देणाऱ्या अभासेच्या वंदना गवळी यांनी शिवसेनेचा हात पकडल्याने गीता गवळी या शिवसेनेसोबत राहणार की उबाठा शिवसेना की भाजपासोबत राहणार? असे तर्क-वितर्क लढवले जात आहेत. (Arun Gawli)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community