एनसीबीचे मुंबई विभागाचे प्रमुख समीर वानखेडे यांना मोठा दिलासा मिळाला आहे, ज्या जात प्रमाणपत्रावरून वानखेडे यांच्या नोकरीवर गदा आणण्याचा प्रयत्न एनसीपीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सुरु केला आहे. त्यावर खुद्द राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे उपाध्यक्ष अरुण हलदर पडदा टाकण्याचा निर्णय घेत आहेत. समीर वानखेडे यांनी आयोगाकडे सादर केलेले जात प्रमाणपत्र हे सकृत दर्शनी योग्य आहे, असे हलदर म्हणाले आहे. त्यामुळे अवैध जात प्रमाणपत्राच्या आरोपातून वानखेडे यांची सुटका होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
एक अधिकारी त्याचे काम करतोय, मंत्री आरोप करतोय
एक अधिकारी त्याचे काम करत आहे. मात्र, महाराष्ट्र सरकारचा एक मंत्री त्या अधिकाऱ्यावर व्यक्तिगत आरोप करत आहे. अधिकाऱ्याला जेलमध्ये टाकण्याची धमकी देत आहे. यामागे कारण काय? त्याची चौकशी झाली पाहिजे, असे राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे उपाध्यक्ष अरुण हलदर म्हणाले. वानखेडे यांनी शनिवारी अरुण हलदर यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी त्यांच्याकडील कागदपत्रे हलदर यांना दाखवली. त्यानंतर रविवारी हलदर यांनी माध्यमांशी बोलताना त्यांची भूमिका मांडली.
एनसीबी चे कर्तबगार अधिकारी समीर वानखेडे यांची पत्नी क्रांती रेडकर आणि वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी आज माझ्या मुंबईतील संविधान निवासस्थानी भेट घेतली. माझ्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षाने त्यांना दिलेल्या पाठिंब्याबद्दल आभार मानत त्यांचे दलित असल्याचे जातीचे सर्व पुरावे मला दिले. pic.twitter.com/jIw3iDB1ky
— Dr.Ramdas Athawale (@RamdasAthawale) October 31, 2021
(हेही वाचा : नवाब मलिकांचे आता थेट भाजपाला आव्हान! म्हणाले…)
वानखेडेंचे जात प्रमाणपत्र खोटे ठरू देणार नाही!
वानखेडे मदतीसाठी आयोगासमोर आले होते. आम्ही त्याची चौकशी करत आहोत. मात्र, मी अनुभवाने सांगतो की, त्यांचे जात प्रमाणपत्र योग्य आहे. मात्र, तरीही आम्ही आयोगामार्फत वानखेडेंच्या जात प्रमाणपत्राची चौकशी करत आहोत. एक अधिकारी आपले चुकीचे जात प्रमाणपत्र आयोगासमोर देणार नाही. कारण तो त्याच्या नोकरीचा प्रश्न आहे. माझ्या माहितीप्रमाणे काही लोक समीर वानखेडे यांचे जात प्रमाणपत्र खोटे ठरवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण आयोगाकडून हे होऊ दिले जाणार नाही, असे अरुण हलदर म्हणाले. याप्रकरणात महाराष्ट्र सरकार काय करते ते पाहू. त्यानंतर राष्ट्रीय मागासवर्ग आयोग आपले काम करेल, असेही हलदर यांनी काल स्पष्ट केले.
पग
Join Our WhatsApp Community