दिल्लीतील मद्य धोरण घोटाळा प्रकरणी अंमलबजावणी सांचालनालयाने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना चौकशीसाठी उपस्थित राहण्याबाबत समन्स बजावले होते. परंतु, केजरीवाल यांनी पुन्हा एकदा चौकशीला हजर राहण्यास नकार दिला आहे. ईडीने त्यांना आतापर्यंत ८ वेळा समन्स बजावले असून मुख्यमंत्री सातत्याने ७ वेळा गैरहजर राहिले आहेत. (Arvind Kejriwal)
(हेही वाचा – Ajit Pawar : अजित पवारांचा शिरूरमध्ये येऊन खासदार अमोल कोल्हेंविषयी केला धक्कादायक गौप्यस्फोट; म्हणाले… )
न्यायालयाच्या निर्णयाची प्रतीक्षा करावी – आप
समन्स बेकायदेशीर असल्याचे सांगून ‘आप’ ने एका निवेदनात म्हटले आहे की, ईडीने समन्स पाठवणे थांबवावे आणि या प्रकरणावरील न्यायालयाच्या निर्णयाची प्रतीक्षा करावी कारण ईडीने यापूर्वीच न्यायालयात धाव घेतली आहे. (Arvind Kejriwal)
(हेही वाचा – BMC : महापालिकेतील सिंघम ते चिंगम)
प्रकरण १६ मार्चपर्यंत तहकूब –
एजन्सीच्या समन्सचे पालन न केल्याबद्दल ईडीच्या (Arvind Kejriwal) तक्रारीच्या संदर्भात केजरीवाल १७ फेब्रुवारी रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे राऊज एव्हेन्यू न्यायालयात हजर झाले होते. विधानसभेचे सध्याचे अधिवेशन सुरू असल्यामुळे केजरीवाल यांनी सुनावणीला वैयक्तिकरित्या उपस्थित राहण्यास असमर्थता दर्शवल्यामुळे न्यायालयाने हे प्रकरण १६ मार्चपर्यंत तहकूब केले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community