भाजपविरोधात एकजूट होण्यासाठी मुख्यमंत्री नितीश कुमारांनी बोलावलेल्या बैठकीत दोन पक्ष एकमेकांना भिडले. अरविंद केजरीवाल आणि ओमर अब्दुलांमध्ये जोरदार खडाजंगी झाल्याचे पहायला मिळाले. आम आदमी पक्षाने विरोधकांच्या बैठकीतच काँग्रेसवर गंभीर आरोप केले.
ओमर अब्दुलांनी घेतला आक्षेप
बैठकीत केंद्राकडून आणण्यात येणाऱ्या अध्यादेशाला आम्ही विरोध करतोय आणि बाकी पक्षांनी समर्थन करावे, या अरविंद केजरीवालांच्या भूमिकेवर जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुलांनी आक्षेप घेतला. जेव्हा जम्मू काश्मीरमधून ३७० कलम हटवण्यात आले, तेव्हा तुमच्या पक्षाने आम्हाला समर्थन दिले नाही आणि संसदेत सरकारला पाठिंबा दिला, असे त्यांनी सांगितले.
बैठकीत विरोधक एकमेकांना भिडताना पाहून शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी पुढाकार घेतला. केजरीवालांनी काँग्रेसवर निशाणा साधताच पवार-ठाकरेंनी मध्यस्थी केली. विरोधकांना आपापसातील सर्व मतभेद दूर करुन एकत्र यावे लागेल. शरद पवारांनी राष्ट्रवादी-ठाकरेंचा संदर्भ देत म्हणाले की, आम्ही मागील २५ वर्षांपासून एकमेकांवर टीका करतोय. परंतू मतभेद बाजूला ठेऊन आम्ही एकत्र काम करतोय, तर आता वेळ आली आहे मतभेद विसरुन एकत्र येण्याची असे उद्धव ठाकरे म्हणाले.
(हेही वाचा Mumbai Police : ‘आप मुझे दो लाख दो, मै बॉम्बब्लास्ट रुकाऊंगा’, मुंबई पोलिसांकडेच मागितली खंडणी )
Join Our WhatsApp Community