खोटी आश्वासने देण्यात केजरीवाल आघाडीवर; खासदार Dr. Sudhanshu Trivedi यांचा आरोप

52
खोटी आश्वासने देण्यात केजरीवाल आघाडीवर; खासदार Dr. Sudhanshu Trivedi यांचा आरोप
  • प्रतिनिधी 

अरविंद केजरीवाल सरड्यासारखे रंग बदलतात तसेच अरविंद केजरीवाल दिल्लीच्या जनतेला खोटी आश्वासने देण्यात आघाडीवर असल्याचा आरोप भाजपाचे खासदार डॉ. सुधांशू त्रिवेदी (Dr. Sudhanshu Trivedi) यांनी बुधवारी केला. केजरीवाल त्यांचे नेते सांगतात तसे करत नाही, असे आहे. तर दिल्लीत विधानसभा निवडणुका जवळ आल्यामुळे केजरीवाल रोज नवीन रंग दाखवीत असल्याचे देखील ते म्हणाले. नववर्षानिमित्त भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते डॉ. सुधांशू त्रिवेदी यांनी पत्रकार परिषद घेतली. आप वर टीका करताना डॉ. सुधांशू त्रिवेदी (Dr. Sudhanshu Trivedi) म्हणाले की, मोहल्ला क्लिनिकमधील भ्रष्टाचार उघड झाला आहे. यामुळे जनतेला केजरीवाल समजले आहेत. दिल्लीत निवडणुकीचे वातावरण असताना नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी राजकीय पक्ष एकमेकांवर निशाणा साधत आहेत. भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते डॉ. सुधांशू त्रिवेदी यांनी आम आदमी पक्षावर निशाणा साधला आहे.

(हेही वाचा – Akkalkot Accident : अक्कलकोटमध्ये दर्शन घेऊन निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला; 4 ठार, 7 जखमी)

भाजपा खासदार आणि पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते डॉ. सुधांशू त्रिवेदी (Dr. Sudhanshu Trivedi) यांनी सांगितले की, आप पक्षाच्या प्रत्येक वरिष्ठ नेत्याला भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तुरुंगात पाठवण्यात आले आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि संसदेतील पक्षाचे नेते हे तिघेही तुरुंगात गेले आहेत. भ्रष्टाचाराची इतकी विविधता तुम्ही याआधी पाहिली नसेल. त्यांचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांना मनी लाँड्रिंगच्या आरोपावरून, अमानतुल्ला खान यांना वक्फ बोर्डातील घोटाळ्याच्या आरोपावरून, नरेश बालयान यांना माफियाशी संबंध असल्याच्या आरोपावरून तुरुंगात पाठवण्यात आले.

(हेही वाचा – महाराष्ट्राचे पहिले एआय धोरण तयार करा; माहिती व तंत्रज्ञान मंत्री Ashish Shelar यांचे निर्देश)

राजकीय पक्षांसमोर सर्वात मोठे आव्हान

डॉ. सुधांशू त्रिवेदी (Dr. Sudhanshu Trivedi) पुढे म्हणाले की, आजच्या काळात सर्वच राजकीय पक्षांसमोर सर्वात मोठे आव्हान हे विश्वासार्हतेचे संकट आहे. मला अरविंद केजरीवाल आणि आप ने वचन दिलेले १० मुद्दे शेअर करायचे आहेत. असुरक्षित विद्युत तारांपासून सुटका करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. त्यांच्या कार्यकाळाच्या १० वर्षानंतर परिस्थिती अशी आहे की, २३ जुलै २०२४ रोजी या तारांमुळे एका २६ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. कचऱ्याचे ढीग साफ करू, असे आश्वासन त्यांनी दिले होते. मात्र, दिल्लीतील कचऱ्याच्या ढिगाची उंची ८ मीटरने वाढल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना पत्र लिहून भाजपावर गंभीर आरोप केले आहेत, तर भाजपानेही प्रत्युत्तर देण्यास विलंब केला नाही.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.