दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal Bail) यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. दिल्लीतील सेशन कोर्टने (Rouse Avenue court) एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर त्यांना जामीन मंजूर केला आहे. दिल्ली मद्य धोरणामध्ये (Delhi Excise Policy Case) भ्रष्टाचार केल्याचा त्यांच्यावर आरोप होता. (Arvind Kejriwal Bail)
(हेही वाचा –५० वर्षे राजकारणात केंद्रस्थानी राहूनही शरद पवारांनी मराठा आरक्षण का दिले नाही? Chandrakant Patil यांचा सवाल)
या प्रकरणात त्यांना जामीन मिळाल्यानंतर आपच्या कार्यकर्त्यानी आनंद व्यक्त केला आहे. दरम्यान, ईडीने या जामिनाला विरोध करत 48 तासांचा अवधी मागितला आहे. (Arvind Kejriwal Bail)
(हेही वाचा –Sanjay Raut यांच्या ‘त्या’ वक्तव्यावरुन वारकरी संतापले!)
अरविंद केजरीवाल यांना मद्य घोटाळ्याशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीने त्यांच्यावर कारवाई करत त्यांना अटक केली होती. या आधी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना मे महिन्यात लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी तुरुंगाबाहेर येण्याची परवानगी देण्यात आली होती आणि त्यानंतर निवडणूक संपताच त्यांना तिहार तुरुंगात आत्मसमर्पण करण्याचे आदेश देण्यात आले होते. अरविंद केजरीवाल यांना आता नियमित जामीन मिळाला आहे. (Arvind Kejriwal Bail)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community