दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी भाजपवर मोठे आरोप केले आहेत. भाजप (BJP) दिल्लीतील आप (Aap) सरकार पाडण्याचा प्रयत्न करत आहे. भाजपच्या एका नेत्याने नुकतेच दिल्लीच्या (Delhi) 7 आमदारांशी संपर्क साधला. काही दिवसांनी केजरीवालांना अटक करणार असल्याचे आणि त्यानंतर आमदार फोडणार असल्याचे सांगितले, अशी सोशल मीडिया पोस्ट केजरीवाल यांनी केली आहे.
(हेही वाचा – PM Narendra Modi : लोकप्रतिनिधींचे सभागृहातील वर्तन सभागृहाची प्रतिमा ठरवते)
21 आमदारांना भाजपची ऑफर
भाजपने आपच्या 7 आमदारांना सांगितले आहे की, 21 आमदारांशी चर्चा झाली आहे. आम्ही इतर आमदारांशी बोलत आहोत. त्यानंतर दिल्लीतील आम आदमी पक्षाचे सरकार पाडू. तुम्ही पण येऊ शकता. 25 कोटी देणार आणि भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवा, अशी ऑफर भाजपने दिली आहे, असे अरविंद केजरीवाल यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे.
भाजपचा दावा 21 आमदारांशी बोलल्याचा असला, तरी आमच्या माहितीनुसार त्यांनी फक्त 7 आमदारांशीच चर्चा केली. आमच्या सर्व 7 आमदारांनी भाजपचा प्रस्ताव नाकारला आहे. भाजप नेत्याचे हे संभाषण आपच्या आमदारांनी रेकॉर्ड केले आहे, असा दावा केजरीवाल यांनी केला आहे.
नऊ वर्षांत सरकार पाडण्याचे अनेक कट
केजरीवाल म्हणाले की, भाजप कोणत्याही दारू घोटाळ्याच्या (Delhi liquor scam) चौकशीसाठी मला अटक करू इच्छित नाही. भाजप दिल्लीतील आम आदमी पार्टीचे सरकार पाडण्याचा कट रचत आहे. गेल्या ९ वर्षांत त्यांनी आमचे सरकार पाडण्यासाठी अनेक कट रचले. मात्र त्यांना यश मिळाले नाही. देव आणि लोकांनी आम्हाला नेहमीच साथ दिली. आमचे सर्व आमदारही भक्कमपणे एकत्र आहेत. या वेळीही हे लोक त्यांच्या नापाक हेतूंमध्ये फसतील. (Arvind Kejriwal)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community