भाजपा सिरीयल किलर, मग आप सिरीयल डीलर?

148

दिल्लीमध्ये भाजपाचा सर्वात मोठा विरोधक म्हणजे अरविंद केजरीवाल. केजरीवाल हे अण्णा हजारेंचं आंदोलन हायजॅक करुन राजकीय नेते झाले. कदाचित ही त्यांची पूर्वनियोजित योजना असू शकते. अण्णा हजारेंच्या आंदोलनात शिरायचं आणि हळूच आपला अजेंडा राबवायचा.

( हेही वाचा : गुलाम नबी आझाद, आता झाले आझाद)

केजरीवाल हे काही वर्षांपूर्वी भ्रष्टाचार विरोधी चेहरा म्हणून ओळखले जायचे. सर्वसामान्य दिसणारा व सर्वसामान्य पेहरावात वावरणारा मध्यमवर्गीय चेहरा अशी त्यांनी स्वतःची प्रतिमा निर्माण केली होती. त्यात त्यांना यश मिळालं.

त्रिपुरामध्ये माणिक सरकार यांनी देखील स्वतःची अशीच प्रतिमा निर्माण केली होती. मीडिया डाव्यांचा प्रपोगंडा राबवत असल्यामुळे अनेक वर्षे माणिक सरकार हे साधे सरळमार्गी नेते म्हणूनच देशाला परिचित होते. पण त्रिपुरात मात्र अत्याचाराचं सत्र सुरु होतं. याचा पर्दाफाश दिनेश कांची यांनी पुस्तक लिहून केला आणि पुढे त्यांची पोलखोल झाली आणि त्यांचा खरा चेहरा लोकांना कळाला. जनतेने त्यांना घरी बसवलं.

आता केजरीवाल यांचा खरा चेहरा समोर येऊ लागला आहे. त्यांचे खास मनीष सिसोदिया यांच्यावर ईडीने मोठी कारवाई केली आहे. भ्रष्टाचाराविरोधी चेहर्‍याचाच भ्रष्टाचार लोकांसमोर उघड झाला आहे. त्यामुळे अरविंद केजरीवाल यांची विश्वासार्हता डळमळीत झाली आहे.

आता यावर टिका करताना केजरीवाल म्हणाले की, “शहरात एक सीरियल किलर आला आहे. हा सीरियल किलर प्रत्येक राज्यातील सरकार पाडण्यात मग्न आहे. हा किलर एकामागून एक हत्या करत आहे. या लोकांनी आजपर्यंत २७७ आमदारांना विकत घेतले आहे. त्यासाठी साडेपाच हजार कोटी रुपये खर्च झाले आहेत.”

केजरीवालांचं म्हणणं आहे की भाजपाला मिळालेलं यश हे पैशांच्या बळावर मिळालं आहे आणि त्यांना सरकार पाडायचे आहे. कोणत्याही राजकीय पक्षाला स्वतःचं सरकार स्थापन करायचं असतं. त्यासाठी ते जनतेतून बहुमताने निवडून येतात आणि सत्ता काबीज करतात. केजरीवाल यांनी देखील तेच केलं आणि भाजपा देखील तेच करत आहे. भाजपाला मिळणारं यश हे खूप मोठं आहे म्हणून त्यांच्या विरोधकांना त्रास होऊ लागलेला आहे. पण भाजपाचा अनेक वर्षांपासूनचा संघर्ष पाहिला तर हे यश झटक्यात मिळालं असं नव्हे.

तर केजरीवाल यांनी भाजपा सिरीयल किलर म्हटलं आहे, पण ते स्वतःच अण्णा हजारेंचा विश्वास तोडून राजकीय नेता झाले आहेत. त्यानंतर त्यांना देशातील जनतेने नाकारलं. मग ते दिल्लीत स्थायिक झाले, आता पंजाबमध्ये त्यांची सत्ता आलेली आहे. आता मनीष सिसोदिया यांचा भ्रष्टाचार उघड झाला आहे. हा एकंदर प्रवास पाहता आपल्याच गुरुच्या पाठीत खंजीर खुपसणार्‍या माणसाला सिरीयल डीलर का म्हणू नये? मनीष सिसोदिया हा समोर आलेला भ्रष्टाचारी चेहरा आहे. पण असे किती डील्स त्यांनी केले आहेत? कदाचित लवकरच मनीष सिसोदिया बोलू लागतील. म्हणूनच केजरीवाल यांना इतका त्रास होतोय का?

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.