मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना कोर्टाने दुसरा मोठा दणका दिला आहे. न्यायालयीन कोठडीत असताना वकिलांना भेटण्याबाबत अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांची याचिका दिल्लीच्या राऊज एव्हेन्यू कोर्टाने (Rouse Avenue Court) फेटाळली आहे. अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी त्यांच्या वकिलांना आठवड्यातून पाच वेळा भेटण्याची परवानगी मागितली होती. मात्र, त्यांना आठवड्यातून दोनदा भेटण्याची परवानगी देण्यात आली आहे. (Arvind Kejriwal)
(हेही वाचा – Sharad pawar: शरद पवार गटाकडून दोन उमेदवार जाहीर)
अरविंद केजरीवाल यांची मागणी फेटाळली
अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी आपल्या याचिकेत म्हटले आहे की, त्यांच्याविरुद्ध देशभरात ३० हून अधिक खटले प्रलंबित आहेत, त्यामुळे प्रकरण समजून घेण्यासाठी आणि सूचना देण्यासाठी आठवड्यातून केवळ दोनवेळा भेट पुरेशी नाही. त्याचवेळी ईडीने या याचिकेला विरोध करत जेल मॅन्युअल याला परवानगी देत नसल्याचे सांगितले. यानंतर राऊस एव्हेन्यू कोर्टाने दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून अरविंद केजरीवाल यांची मागणी फेटाळून लावली. (Arvind Kejriwal)
(हेही वाचा – PM Narendra Modi: शिंदेंच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी पंतप्रधान रामटेक दौऱ्यावर)
गेल्या २४ तासांत अरविंद केजरीवाल यांना हा दुसरा मोठा दणका
गेल्या २४ तासांत अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना हा दुसरा मोठा धक्का आहे. यापूर्वी, ईडीच्या अटकेला आव्हान देणारी अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांची याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने (Delhi High Court) फेटाळली होती. अरविंद केजरीवाल यांनी आपचे संयोजक या नात्याने व इतरांसोबत सहभागी होऊन मद्य धोरणाचे कारस्थान रचून लाचेची मागणी केली, असे पुरावे ईडीने सादर केले आहेत. त्यांची ईडीने केलेली अटक अवैध ठरविता येणार नाही, असा निकाल उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती स्वर्णकांता शर्मा यांनी दिला. तसेच, साक्षीदाराला माफी आणि जामीन देणे ईडीच्या अखत्यारीत येत नसून, ती न्यायिक प्रक्रिया आहे. माफीच्या प्रक्रियेवर संशय व्यक्त करणे, म्हणजे न्यायालयाच्या प्रक्रियेवर संशय व्यक्त करणे ठरेल. माफीचा कायदा शंभर वर्षे जुना आहे, तो काही आत्ता आलेला नाही, असेही निकालात म्हटले आहे. (Arvind Kejriwal)
हे पहा –
Join Our WhatsApp Community