Delhi CM Arvind Kejriwal यांना जामीन देण्यास नकार; न्यायालयीन कोठडीत १९ जूनपर्यंत वाढ

144
Delhi CM Arvind Kejriwal यांना जामीन देण्यास नकार; न्यायालयीन कोठडीत १९ जूनपर्यंत वाढ

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Delhi CM Arvind Kejriwal) यांना आणखी एक धक्का बसला आहे. कथित मद्या धोरण घोटाळ्याशी संबंधित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात वैद्याकीय कारणास्तव अंतरिम जामिनासाठीचा त्यांचा अर्ज बुधवारी दिल्ली न्यायालयाने फेटाळला. तसेच न्यायाधीशांनी केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत १९ जूनपर्यंत वाढ केली आहे. त्याचवेळी विशेष न्यायाधीश कावेरी बावेजा (Special Judge Kaveri Baveja) यांनी तिहार तुरुंग अधिकाऱ्यांना न्यायालयीन कोठडीत त्यांच्या वैद्याकीय गरजांची काळजी घेण्याचे निर्देश दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) प्रचारासाठी दिलेला २१ दिवसांचा अंतरिम जामीन समाप्त झाल्यावर अरविंद केजरीवाल यांनी आत्मसमर्पण केले.  (Delhi CM Arvind Kejriwal)

मात्र, त्यानंतर अंतरिम जामीन मिळावा, यासाठी पुन्हा एकदा न्यायालयात याचिका दाखल केली होती. केजरीवाल यांच्या याचिकेवरील सुनावणी घेताना दिल्लीतील शहर न्यायालयाने त्यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ केली असून, अंतरिम जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. त्यामुळे केजरीवाल यांना हा मोठा धक्का मानला जात आहे. यापूर्वी झालेल्या याचिकेवरील सुनावणीवेळी ईडीकडून (ED) या अंतरिम जामिनाला जोरदार विरोध करण्यात आला होता. याचिका सुनावणीयोग्य नसल्याचा युक्तिवाद ईडीच्यावतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एस. व्ही. राजू यांनी केला. 

(हेही वाचा – T20 WC, Ind vs Ire : भारताचा आयर्लंडवर मोठा विजय, खेळपट्टीवर मात्र होतेय टिका 

केजरीवाल ३९ दिवसांनंतर तिहार तुरुंगातून बाहेर आले 

केजरीवाल ३९ दिवसांनंतर १० मे रोजी तिहार तुरुंगातून बाहेर आले. ईडीने त्यांना २१ मार्च रोजी अटक केली होती. यापूर्वी तपास यंत्रणेने त्यांना ९ समन्स पाठवले होते. मात्र, केजरीवाल एकदाही चौकशीसाठी तपास यंत्रणेसमोर हजर झाले नाहीत. केजरीवाल अटकेनंतर पहिले १० दिवस ईडीच्या कोठडीत होते. १ एप्रिल रोजी न्यायालयाने त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत तिहार तुरुंगात केली होती. १० मे पर्यंत म्हणजेच त्यांनी तिहारमध्ये ३९ दिवस घालवले. १० मे रोजी सायंकाळी ते बाहेर पडले.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.