सध्या देशभरात २२ जानेवारी रोजी अयोध्या येथे रामललाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापनेचा (Ayodhya Ram Mandir) विषय जोरदार चर्चेला येत आहे. देशभरातून ११ हजार जणांना निमंत्रित करण्यात आले आहे. मात्र या निमंत्रणावरून राजकारण सुरु झाले आहे. भाजप विरोधी पक्ष निमंत्रण मिळूनही कार्यक्रमाला येणार नाहीत, तर काही जण त्यांच्या त्यांच्या राज्यात वेगळा कार्यक्रम करणार आहेत. अशातच आम आदमी पक्षाचे अध्यक्ष, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मात्र वेगळीच भूमिका मांडली आहे. त्यांना निमंत्रण आले नाही, मात्र ते या निमंत्रणाची आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत, अशी प्रतिक्रिया अरविंद केजरीवाल यांनी दिली आहे.
काय म्हणाले अरविंद केजरीवाल?
मला औपचारिक निमंत्रण मिळालेले नाही. मंदीर समितीने मला राम मंदिर प्राणप्रतिष्ठेचे अंतिम निमंत्रण पाठवलेले नाही. परंतु, मी माझे आई-वडील आणि पत्नीसमवेत २२ जानेवारीनंतर अयोध्येला जाणार आहे. माझे आई-वडील अयोध्येला जाण्यासाठी आतुर आहेत. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने अद्याप निमंत्रण पाठवलेले नाही. परंतु, मला सांगण्यात आले होते की, प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे (Ayodhya Ram Mandir) एक खासगी निमंत्रण मला पाठवले जाईल. तेदेखील मला अद्याप मिळालेले नाही. सुरक्षेच्या कारणास्तव एका निमंत्रण पत्रिकेवर केवळ एकच व्यक्ती राम मंदिराच्या आवारात जाऊ शकते. त्यामुळे मी माझ्या कुटुंबाला घेऊन २२ जानेवारीनंतर अयोध्येला जाणार आहे, असे अरविंद केजरीवाल म्हणाले.
(हेही वाचा PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जागवल्या लतादीदींच्या आठवणी; शेअर केला ‘हा’ व्हिडिओ)
काँग्रेसची निमंत्रण मिळूनही नकारात्मकता
काँग्रेसने राम मंदिर प्राणप्रतिष्ठा (Ayodhya Ram Mandir) कार्यक्रमाचे निमंत्रण नाकारले आहे. काँग्रेसने याबाबत एक निवेदन जारी केले आहे. यामध्ये ‘आम्ही राम मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचे निमंत्रण सन्मानपूर्वक नाकारत आहोत. काँग्रेसने राम जन्मभूमी ट्रस्टने पाठवलेले निमंत्रण नाकारल्यामुळे २२ जानेवारी रोजी अयोध्या येथे होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला काँग्रेसच्या माजी अध्यक्षा आणि खासदार सोनिया गांधी तसेच काँग्रेसचे विद्यमान अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह कोणताही काँग्रेस नेता उपस्थित राहणार नाही.
Join Our WhatsApp Community