Arvind Kejriwal: जामीन मुदत संपत येताच केजरीवालांचा आजार वाढला!

138
Arvind Kejriwal: जामीन मुदत संपत येताच केजरीवालांचा आजार वाढला!
Arvind Kejriwal: जामीन मुदत संपत येताच केजरीवालांचा आजार वाढला!

निवडणूक प्रचारासाठी आम आदमी पक्षाचे अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांचा सर्वोच्च न्यायालयाने २१ दिवसांचा जामीन मंजूर केला होता. आता २१ दिवसांच्या जामीनाची मुदत उद्या म्हणजे १ जून रोजी संपत असून २ जून रोजी त्यांना तिहार तुरुंगात हजर राहायचं आहे. त्याआधी त्यांनी जनतेशी भावनिक संवाद साधला आहे. जामीन मुदत संपत येताच केजरीवालांचा आजार वाढला आहे. अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांची प्रकृती ठिक नसल्याने त्यांनी जामीन मुदती वाढवून मागितली होती. परंतु, जामीन मुदतीचा अर्ज सर्वोच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रारनेच फेटाळून लावला. त्यामुळे अरविंद केजरीवाल यांना २ जून रोजी तिहार तुरुंगात हजर राहावं लागणार आहे. (Arvind Kejriwal)

(हेही वाचा –Zakir Naik ला आंतरराष्ट्रीय आतंकवादी घोषित करा; Hindu Janajagruti Samiti ची मागणी)

अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) म्हणाले, “सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक प्रचारासाठी २१ दिवसांचा जामीन दिला होता. उद्या २१ दिवस पूर्ण होत आहेत. परवा मला सरेंडर व्हायचं आहे. मी पुन्हा तिहार तुरुंगात जाईन. मला माहित नाही यावेळी ते मला कितीवेळ तुरुंगात ठेवतील. पण माझे मन मोठे आहे. देशाला हुकूमशाहीतून वाचवण्यासाठी तुरुंगात जातोय, याचा मला अभिमान आहे. यांनी मला तोडण्याचा, हरवण्याचा, झुकवण्याचा प्रयत्न केला. परंतु ते यशस्वी होऊ शकले नाहीत. मी जेव्हा तुरुंगात होतो तेव्हा त्यांनी मला अनेक त्रास दिले. त्यांनी माझा औषधोपचार रोखला. २० वर्षांपासून मी मधुमेहाचा रुग्ण आहे. गेल्या २० वर्षांपासून मला रोज चारवेळा इन्सुलिनचे इंजेक्शन माझ्या पोटात दिले जातात. तुरुंगात यांनी कित्येक दिवस इन्सुलिन बंद केलं. त्यामुळे माझी शुगर ३००-३२५ पर्यंत पोहोचली. इतके दिवस शुगर उच्च पातळीवर राहिल्यास किडनी आणि लिव्हर खराब होतो. त्यांना काय पाहिजे माहीत नाही, ते असं का करतात हे कळत नाहीय.” (Arvind Kejriwal)

(हेही वाचा –Malaysia : मलेशियाचे पंतप्रधान भारत भेटीवर येणार)

“तुरुंगात मी ५० दिवस होतो. या ५० दिवसांत माझं ६ किलोने वजन कमी झालंय. तुरुंगात गेलो तेव्हा माझं वजन ७० किलो होतं. आता ६४ किलो आहे. तुरुंगातून बाहेर आल्यानंतरही वजन वाढलं नाही. डॉक्टर म्हणाले की, शरीरातील मोठ्या आजाराचं हे लक्षण आहे. त्यासाठी काही चाचण्या करण्याची गरज आहे. माझ्या युरिनमध्ये किटोन पातळी वाढली आहे. परवा मी शरण जाणार आहे. त्यासाठी मी दुपारी ३ वाजता घरातून निघेन. कदाचित यावेळी ते अधिक त्रास देतील. पण मी झुकणार नाही. तुम्ही तुमची काळजी घ्या. तुरुंगात मला तुमची फार काळजी वाटते. तुम्ही आनंदी असाल तर तुमचा केजरीवाल आनंदी राहील. मी तुमच्या आजूबाजूला नसेन पण तुमची कामं सुरू राहणार आहेत. मी कुठेही असलो तरीही तुमची कामं थांबणार नाहीत. मी परत आल्यावर कुटुंबातील प्रत्येक माताभगिनीला हजार रुपये देण्याचीही योजना सुरू करणार आहे.” असं केजरीवाल म्हणाले आहेत. (Arvind Kejriwal)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.