मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना सोमवार, (१ एप्रिल) दिल्लीतील राऊस एव्हेन्यू न्यायालयाने १५ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. दिल्ली मद्य धोरणाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणी २१ मार्च रोजी ‘ईडी’ने केजरीवाल यांना अटक केली होती. सोमवारी त्यांच्या ‘ईडी’कोठडीची मुदत संपली होती. सुनावणीपूर्वी अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल, आपचे नेते सौरभ भारद्वाज, आतिशी, गोपाल राय यांच्यासह अनेक नेते न्यायालयात उपस्थित होते.
सुनावणीवेळी न्यायालयाने ‘ईडी’ला स्टेटस रिपोर्ट सादर करण्याचे निर्देश दिले. याचिकाकर्त्याच्या अधिकारक्षेत्रावर भाष्य केलेले नाही, असे न्यायालयानेही स्पष्ट केले. यावेळी ‘ईडी’ने केजरीवाल यांना १५ दिवस न्यायालयीन कोठडी सुनावण्याची मागणी केली. दिल्लीतील राऊस एव्हेन्यू न्यायालयाने केजरीवाल यांना १५ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली.
Join Our WhatsApp CommunityDelhi Chief Minister Arvind Kejriwal remanded to judicial custody till April 15 in the liquor policy case. #ArvindKejriwal #ED pic.twitter.com/qMCVF8K2vC
— Live Law (@LiveLawIndia) April 1, 2024