Arvind Kejriwal : ईडी प्रकरणात अरविंद केजरीवाल यांना अंतरिम जामीन मंजूर; सुटका होणार की नाही? जाणून घ्या..

142
Arvind Kejriwal यांना सशर्त जामीन

दिल्लीचे (Delhi) मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Chief Minister Arvind Kejriwal) यांना दारू घोटाळ्याप्रकरणी (Liquor Scam Case) सर्वोच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीन मिळाला आहे. मात्र अंमलबजावणी संचालनालयाने त्यांच्या अटकेचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयाच्या मोठ्या खंडपीठाकडे सोपवले आहे. (Arvind Kejriwal)

(हेही वाचा –“विधानपरिषदेच्या निवडणुकीत राजकीय भूकंप झाला तर…” Raosaheb Danve काय म्हणाले?)

केजरीवाल यांच्या अटकेला आव्हान देणाऱ्या याचिकेचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयाने मोठ्या खंडपीठाकडे सोपवले आहे. आता सर्वोच्च न्यायालयाचे तीन न्यायाधीशांचे खंडपीठ केजरीवाल यांच्या याचिकेवर सुनावणी करणार आहे. सरन्यायाधीश या प्रकरणात तीन न्यायाधीशांची नियुक्ती करतील. या प्रकरणाची मोठ्या खंडपीठासमोर सुनावणी होईपर्यंत केजरीवाल यांना अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला आहे. (Arvind Kejriwal)

(हेही वाचा –PM Narendra Modi : पंतप्रधानांच्या दौऱ्यापूर्वीच लष्करातील जवानाचा बनाव उघड!)

अंमलबजावणी संचालनालयाने केलेल्या अटकेविरोधात केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. या प्रकरणात हे देखील महत्त्वाचे ठरणार आहे कारण दोनच दिवसांपूर्वी ईडीने उच्च न्यायालयात आरोपपत्र सादर केले आहे, ज्यामध्ये केजरीवाल या घोटाळ्यातील मुख्य आरोपी असल्याचे म्हटले आहे. (Arvind Kejriwal)

केजरीवाल सध्या तुरुंगातच राहणार 

पण केजरीवाल अजून तुरुंगातून बाहेर येऊ शकणार नाहीत. ते सध्या सीबीआयच्या कोठडीत आहेत. पण त्याला ईडी प्रकरणात जामीन मिळाला आहे. अशा स्थितीत केजरीवाल अजूनही तुरुंगातच राहणार आहे. (Arvind Kejriwal)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.