Aam Aadmi Party चा मुख्य ‘आदमी’चं पराभूत; भाजपाची ऐतिहासिक विजयाकडे वाटचाल

151
Aam Aadmi Party चा मुख्य 'आदमी'चं पराभूत; भाजपाची ऐतिहासिक विजयाकडे वाटचाल
Aam Aadmi Party चा मुख्य 'आदमी'चं पराभूत; भाजपाची ऐतिहासिक विजयाकडे वाटचाल

दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांचा पराभव झाला आहे. नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातून भाजपाच्या परवेश वर्मा यांनी केजरीवाल यांचा पराभव केला आहे. दिल्ली विधानसभेच्या (Delhi Assembly) ७० जागांचा निकाल दि. ८ फेब्रुवारी रोजी जाहीर होत आहे. त्यात ‘आप’ ला जोरदार धक्का बसला आहे कारण ‘आप’चे प्रमुख अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) आणि ‘आप’चे वरिष्ठ नेते मनिष सिसोदीया (Manish Sisodia) यांचा पराभव झाला आहे. तसेच आपच्या आतिशी मार्लेना या ही पिछाडीवर असल्याचे पाहायला मिळत आहे. (Aam Aadmi Party ) अरविंद केजरीवाल यांचा ३ हजार १८२ मतांनी पराभूत झाले आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.