
दिल्ली दारू घोटाळ्यात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना अटक झाल्यानंतर आम आदमी सरकारच्या अडचणी वाढल्या आहेत. केजरीवाल तुरुंगातून सरकार चालवण्याची भाषा करत आहेत, तर दुसरीकडे भाजप नैतिक आधारावर केजरीवालांच्या राजीनाम्याची मागणी करत आहे. या दरम्यान आपचे माजी आमदार संदीप कुमार यांनी आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना हटवण्याची मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल केली आहे.
(हेही वाचा – Mangaldas Bandal : मंगलदास बांदल यांची शिरुरची उमेदवारी रद्द; वंचितची घोषणा.. काय आहे कारण…)
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना हटवण्याची मागणी करणारी याचिका आम आदमी पार्टीचे (आप) माजी आमदार आणि मंत्री संदीप कुमार यांनी शनिवार, ६ एप्रिल रोजी दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केली. ‘अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अटक केल्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्रीपद भूषवण्याचा अधिकार गमावला आहे’, असे त्यांनी आपल्या याचिकेत म्हटले आहे.
उच्च न्यायालयाचे खंडपीठ या याचिकेवर सोमवारी, 8 एप्रिल रोजी सुनावणी करण्याची शक्यता आहे. मात्र हा मुख्यमंत्र्यांच्या अधिकारक्षेत्राचा विषय असल्याचे सांगून न्यायालयाने यापूर्वी अशाच मागण्यांसह दोन याचिका फेटाळल्या होत्या. त्यात न्यायालयाने हस्तक्षेप करण्याचे कोणतेही कारण नाही.
कोठडीत असताना अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी मुख्यमंत्रीपदावर राहायचे की नाही, हे उपराज्यपाल किंवा राष्ट्रपती ठरवतील, असे न्यायालयाने यापूर्वीच्या याचिकांवर सुनावणी करतांना म्हटले आहे. घटनात्मक संकट आल्यास दिल्लीचे नायब राज्यपाल किंवा राष्ट्रपती त्यानुसार निर्णय घेतील. न्यायालय यावर निर्णय घेऊ शकत नाही.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community