Arvind Kejriwal यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा धक्का

230
Arvind Kejriwal यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा धक्का

सुप्रीम कोर्टाने सोमवारी केजरीवाल सरकारला (Arvind Kejriwal) मोठा धक्का दिला आहे. नायब राज्यपालांचे नामनिर्देशित दहा नगरसेवकांची नियुक्ती करण्याचा अधिकार कोर्टाने कायम ठेवला आहे. तसेच या नियुक्तीसाठी सरकारची सहमती आवश्यक नसल्याचेही कोर्टाने स्पष्ट केले आहे. नगरसेवकांच्या नियुक्ती रखडल्याने स्थायी समितीची निवडणूकही रखडली होती. कारण हे नगरसेवकही यामध्ये मतदान करतात. दिल्ली महापालिकेत आपचे 134 तर भाजपाचे 104 निवडून आलेले नगरसेवक आहेत. याशिवाय दहा नायब राज्यपाल नामनिर्देशित नगरसेवक नियुक्त केले जातात. आता नायब राज्यपाल विनय कुमार सक्सेना यांच्याकडून या नियुक्ती केल्या जातील.

नायब उपराज्यपाल सरकारच्या सल्ल्याशिवाय दहा नामनिर्देशित नगरसेवकांची नियुक्ती करू शकतात, त्यांना तो अधिकार असल्याचे कोर्टाने म्हटले आहे. हा आम आदमी पक्षासाठी मोठा धक्का मानला जात आहे. या नगरसेवकांच्या नियुक्तीवरून मागील काही दिवसांपासून वाद सुरू होता. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने नायब राज्यपालांना दहा नगरसेवकांच्या नियुक्तीचा अधिकार देण्याचा निकार दिला. या नगरसेवकांची नियुक्ती राज्यपालांचे घटनात्मक कर्तव्य असल्याचे कोर्टाने म्हटले आहे. राज्याचे मंत्रिमंडळाची मदत किंवा सल्ला त्यांना बंधनकारक नाही, असे कोर्टाने स्पष्ट केले आहे. (Arvind Kejriwal)

(हेही वाचा – निवडणूक बदनाम करण्याचा प्रयत्न: Election Commission चे काँग्रेसच्या आरोपांना उत्तर)

दिल्ली महापालिकेत आपचे बहुमत आहे. त्यामुळे सध्यातरी पक्षाला कोणताही धोका नाही. डिसेंबर 2022 मध्ये झालेल्या निवडणुकीत आपने भाजपाची 15 वर्षांची सत्ता उलथून टाकली. भाजपाला 104 जागांवर समाधान मानावे लागले. तर काँग्रेसचे केवळ नगरसेवक निवडून आले. दरम्यान, आपचे खासदार संजय सिंह यांनी सुप्रीम कोर्टाच्या निकालावर नाराजी व्यक्त केली आहे. हा निकाल म्हणजे भारतीय लोकशाही धक्का देणारा आहे. जनतेने निवडून दिलेल्या सरकारला बायपास करून नियुक्ती करणे योग्य नसल्याचे सिंह यांनी म्हटले आहे. (Arvind Kejriwal)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.