दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे गुजरातमध्ये आले असता ते थेट रिक्षात जाऊन बसले. त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेले गुजरात पोलीस मात्र मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या संरक्षणासाठी पुढे सरसावले. मात्र त्यावेळी संतापलेले केजरीवाल यांनी पोलिसांना चक्क हाकलून लावत मला नको तुमचे संरक्षण मी जनतेचा नेता आहे, मला संरक्षणाची गरज नाही. मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या अजब दाव्यामुळे सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे.
केजरीवाल म्हणतात, मला जबरदस्तीने संरक्षण नको
रिक्षात बसून मुख्यमंत्री केजरीवाल चक्क गुजरात पोलिसांशी वाद घालू लागले. मला तुमच्या राज्याचे संरक्षण नको, असे मी लेखी सांगितले असतानाही तुम्ही जबरदस्तीने मला संरक्षण का देत आहात?, मला तुमच्या संरक्षणाची गरज नाही, तुम्ही तुमच्या मुख्यमंत्र्याला संरक्षण द्या, मी जनतेचा नेता आहे. अशा प्रकारे मला जबरदस्तीने संरक्षण देऊन मला होम अरेस्ट करू शकत नाही, असे मुख्यमंत्री केजरीवाल बोलत होते. हा व्हिडीओ दिवसभर सोशल मीडियात व्हायरल होत होता.
(हेही वाचा काँग्रेसची भारत जोडो यात्रा नाही, तर आग लगाओ यात्रा! संघाच्या गणवेशाचा अवमान, भाजपाचा पलटवार )
सोशल मीडियात टीका
अभिनव कुमार म्हणतात, रोज थप्पड खायेगा
रोज थप्पड़ खायेगा। https://t.co/CnU2Ctl2i4
— Abhinav Kumar (@abhinav_gkp) September 12, 2022
प्रभात मिश्रा म्हणाले, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना विनंती आहे की, केजरीवाल यांची दिल्लीतीलही सुरक्षा काढून घ्यावी.
Join Our WhatsApp CommunityRequest to Home minister sri @AmitShah sir, kindly accept.his request and remove the security provided to him in Delhi also. https://t.co/Mc2UGfMyY8
— Prabhat Mishra (@Prabhat01101985) September 12, 2022