आर्यन खान अडकला! ईदही तुरूंगातच साजरी करावी लागणार

आर्यन खानसह ८ जणांच्या जामीन अर्जावर गुरुवारी, १४ ऑक्टोबर रोजी सुनावणी पूर्ण केली. त्यानंतर न्यायमूर्तींनी सुनावणी दरम्यानच्या नोंदी समजून घेण्यासाठी वेळ लागणार आहे. त्यामुळे याचा निर्णय २० ऑक्टोबर पर्यंत राखून ठेवला आहे.

67

आर्यन खानसह ८ आरोपींच्या जामीन अर्जावर सत्र न्यायालयात सुनावणी झाली, दिवसअखेर न्यायमूर्ती व्ही.व्ही. पाटील यांनी हा निर्णय २० ऑक्टोबरपर्यंत राखून ठेवला. त्यामुळे आर्यनचा ६ दिवस मुक्काम वाढला आहे. विशेष म्हणजे १९ ऑक्टोबर रोजी ईद-ए-मिलाद आर्यनला ईदही तुरूंगातच साजरी करावी लागणार आहे.

२ ऑक्टोबर रोजी कॉर्डेलिया क्रूझ ड्रग पार्टीच्या छाप्यात आर्यन खानला ताब्यात घेण्यात आले. एनसीबीचे म्हणणे आहे की आर्यनचा मित्र अरबाज मर्चंटकडून काही प्रमाणात ड्रग्ज जप्त करण्यात आले आहेत. आर्यन आणि अरबाज एकाच खोलीत राहणार असल्याच्या बातम्या आल्या होत्या. एनसीबीच्या म्हणण्यानुसार, आर्यनने कबूल केले होते की हे दोघेही अरबाजसोबत सापडलेले ड्रग्ज घेणार होते. त्याचबरोबर एनसीबीला आर्यनच्या आंतरराष्ट्रीय ड्रग ट्रॅफिकिंग लिंकशी जोडण्याचे संकेतही मिळाले आहेत.

(हेही वाचा : आर्यन खान आजचीही रात्र तुरूंगातच काढणार!)

एनसीबीचे अनिल सिंह यांनी काय केला युक्तीवाद?

सध्याचा अर्जदार (आर्यन) प्रथमच ग्राहक नाही. न्यायालयासमोर ठेवलेले रेकॉर्ड आणि पुरावे दर्शवतात की, तो गेल्या काही वर्षांपासून प्रतिबंधित पदार्थांचा नियमित ग्राहक आहे. अर्जदारासोबत आलेल्या अरबाज मर्चंटच्या ताब्यातून प्रतिबंधित साहित्य सापडले आहे. हे निवेदन आणि पंचनामामध्ये स्पष्टपणे नोंदवले गेले आहे की, ते दोन्ही बंदी घातलेले पदार्थ वापरणार होते. अर्जदाराने स्वाक्षरी केलेल्या पंचनाम्यातील हा रेकॉर्ड स्पष्टपणे सिद्ध करतो की, त्याच्याकडे बंदी घातलेला पदार्थ होता. कारण त्याने कबूल केले होते की, प्रतिबंधित पदार्थ या दोघांसाठी त्याच्या मित्राकडे होता. एनसीबीतर्फे हजर असणाऱ्या एएसजी अनिल सिंग यांनी न्यायालयाला सांगितले की, अर्जदारासोबत काहीही सापडले नाही हा युक्तीवाद योग्य असू शकत नाही. एनडीपीएस कायद्यांतर्गत सर्व गुन्हे अजामीनपात्र आहेत. या प्रकरणात आचित आणि शिवराज हे ड्रग डीलर्स आहेत. त्यामुळे या प्रकरणात देखील जामीन मंजूर केला जाऊ शकत नाही.

न्यायालयाने निर्णय राखून ठेवला

दरम्यान आर्यन खानसह ८ जणांच्या जामीन अर्जावर गुरुवारी, १४ ऑक्टोबर रोजी सुनावणी पूर्ण केली, त्यानंतर न्यायमूर्तींनी सुनावणी दरम्यानच्या नोंदी समजून घेण्यासाठी वेळ लागणार आहे, असे सांगत याचा निर्णय २० ऑक्टोबरपर्यंत राखून ठेवला. विशेष म्हणजे १९ ऑक्टोबर रोजी ईद-ए-मिलाद आहे. त्यामुळे आर्यनला ईदही तुरूंगातच साजरी करावी लागणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.