क्रूझवरील ड्रग्स पार्टीत एनसीबीने ताब्यात घेतलेला बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचा मुलगा आर्यन याला अखेर गुरुवारी, २८ ऑक्टोबर रोजी मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. तब्बल २५ दिवस कारागृहात काढल्यावर आर्यनची सुटका होणार आहे. मात्र तरीही आर्यन आजच्या आज कारागृहाच्या बाहेर पडू शकणार नाही. कारण कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी वेळ लागणार असल्याने त्याला कारागृहाबाहेर पाडण्यासाठी उद्याचा दिवस पाहावा लागणार आहे.
३ ऑक्टोबर रोजी आर्यन खानला अटक
न्यायमूर्ती नितीन साम्ब्रे यांच्या न्यायालयात आर्यन खान, अरबाझ मर्चंट आणि मुनमुन धमेचा या तिघांच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली. न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला, मात्र न्यायालयाच्या आदेशाची प्रत शुक्रवारी सकाळपर्यंत येण्याची शक्यता आहे, त्यामुळे या तिघांना आजची रात्र तरी कारागृहातच काढावी लागणार आहे. आरोपींना जामीन दिल्यास ते पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करतील, असा युक्तीवाद एनसीबीने केला होता. ३ ऑक्टोबर रोजी क्रूझवर झालेल्या ड्रग्स पार्टीत आर्यन खानला अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याला जामीन मिळावा म्हणून शाहरुख खान बरेच प्रयत्न करत होता.
वडिलांचा वाढदिवस ‘मन्नत’वर साजरा करणार
क्रूझ ड्रग्स प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आर्यन खानला गुरुवारी उच्च न्यायालयाने जामीन दिला. २ नोव्हेंबर रोजी शाहरुख खानचा वाढदिवस असून आर्यन खान वडिलांचा वाढदिवस ‘मन्नत’वर साजरा करणार आहे, तसेच आर्यन खान याचा वाढदिवस १३ नोव्हेंबर रोजी आहे. मात्र आई गौरी खानच्या वाढदिवशी ८ ऑक्टोबर रोजी आर्यन खान न्यायालयीन कोठडीत होता.
(हेही वाचा : क्रांती रेडकरची मुख्यमंत्र्यांना बहिणीच्या नात्याने आर्जव! म्हणाली…)
Join Our WhatsApp Community