तब्बल ३४२ जणांना मिळाली कमी मते; Nawab Malik यांच्यासह मनसे आणि वंचितच्या उमेदवारांचा समावेश

97
विधानसभा निवडणूक रिंगणात अनेक उमेदवारांनी लाखांहून अधिक मते घेतली असली तरी कित्येक उमेदवारांना आपले डिपॉझिटही राखता आले नाही. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार आणि माजी मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांच्यासह मनसे, वंचित बहुजन आघाडी, बसपाबरोबरच जवळपास ३४२ उमेदवारांना कमी मते मिळाली आहेत. त्यामुळे त्यांनी निवडणूक आयोगाकडे भरलेले डिपॉझिट जप्त होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरताना संबंधित उमेदवारावा निवडणूक आयोगाकडे १० हजार रुपये अनामत रक्कम भरावी लागते. निवडणूक निकालानंतर संबंधित उमेदवाराला झालेल्या एकूण मतदानापैकी किमान १/६ म्हणजे १६.३३ टक्के एवढी मते घेतली असतील, तर त्यांनी भरलेली डिपॉझिटची रक्कम परत केली जाते. त्यापेक्षा कमी मते मिळाल्यास सदरची रक्कम जप्त केली जाते.
मुंबई शहर आणि उपनगरातील ३६ विधानसभा मतदारसंघांतून ४२० उमेदवार निवडणूक रिंगणात होते. शनिवारी जाहीर झालेल्या निकालानुसार ३४२ उमेदवारांना आपले डिपॉझिट गमवावे लागणार असल्याचे दिसत आहे. त्यामध्ये वेगवेगळ्या पक्षांचे ८२ उमेदवार असून २६० अपक्ष उमेदवार आहेत. त्याशिवाय वंचित बहुजन आघाडी, बहुजन समाज पार्टी, एमआयएमचाही समावेश आहे. (Nawab Malik)

मनसेला १३ ठिकाणी धक्का

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मुंबईतील वेगवगेळ्या २५ जागा लढवल्या होत्या. त्यामध्ये जवळपास १३ ठिकाणी त्यांच्या उमेदवारांना अल्प मते मिळाली असल्याने त्यांचे डिपॉझिट जप्त होणार असल्याचे दिसत आहे. दरम्यान, मनसेने दिंडोशी, विक्रोळी, भांडुप पश्चिम, घाटकोपर पश्चिम, अणुशक्तीनगर, माहीम, वरळी आणि शिवडी या मतदारसंघांत चांगली मते घेतली आहेत. (Nawab Malik)

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.