आता संजय राऊतांकडून भाजपाला शिवीगाळ!

77

भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी महापौर किशोरी पेडणेकर यांच्याविषयी अपशब्द उच्चारला म्हणून शिवसेना आक्रमक बनली आहे. या प्रकरणी त्यांच्या विरोधात बुधवारी मरिन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र गुरुवारी सकाळी माध्यमांशी बोलताना शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजप नेत्यांच्या विरोधात शिवीगाळ केली. त्यामुळे भाजप आक्रमक झाला असून राऊत यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

आशिष शेलारांवर गुन्हा दाखल

दरम्यान शेलार यांच्याविरोधात भादंवि ३५४ (विनयभंग) आणि ५०९ (स्त्री मनास लज्जा होईल असे वक्तव्य) या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरळी येथे झालेल्या सिलिंडर स्फोटानंतर आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेतली होती आणि नायर रुग्णालयात रुग्णांना तात्काळ उपचार न करता ताटकळत ठेवल्याचा आरोप केला. यावेळी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावरही टीका केली. यात महापौरांना या घटनेची माहिती नव्हती का? ७२ तासांनंतर महापौर रुग्णांच्या चौकशीसाठी पोहोचतात, ७२ तास कुठे निजला होता? अशा शब्दात टीका केली होती. शेलारांच्या कुठे निजला होता? याच वाक्यावर आक्षेप घेत महापौरांनी गृहमंत्र्यांना पत्र लिहित तक्रार केली आहे. तसेच त्यांनी पोलिसात तक्रार केली. दरम्यान या टिप्पणीची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनीही दखल घेतली आहे.

(हेही वाचा ओबीसी आरक्षण : सरकार निष्णात वकिलांची फौज उभी करणार)

संजय राऊतांकडून अपशब्द 

दिल्लीत एका बैठकीत एनसीपीचे अध्यक्ष शरद पवार यांना बसण्यासाठी शिवसेना नेते संजय राऊत यांनी स्वत: खुर्ची आणून दिली. त्यावर भाजपाने टीका केल्यावर राऊत यांनी संतापून भाजपच्या विरोधात थेट शिवीगाळ केली. त्यामुळे भाजप आक्रमक बनली आहे. आता भाजप राऊत यांच्या विरोधात आक्रमक बनला आहे, त्यांच्याविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार करणार असून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.