Nitesh Rane कॅबिनेट मंत्री बनताच कलानगर मातोश्री परिसरात झळकले शुभेच्छाचे बॅनर

193
Nitesh Rane कॅबिनेट मंत्री बनताच कलानगर मातोश्री परिसरात झळकले शुभेच्छाचे बॅनर
Nitesh Rane कॅबिनेट मंत्री बनताच कलानगर मातोश्री परिसरात झळकले शुभेच्छाचे बॅनर
  • विशेष प्रतिनिधी,मुंबई

कणकवली विधानसभेचे भाजपाचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी रविवारी १५ डिसेंबर रोजी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेताच त्यांच्या शुभेच्छांचे फलक आणि बॅनर मुंबईत झळकले. वांद्रे कलानगर येथील पुलावर नितेश राणे हे मंत्री बनल्याबद्दल शुभेच्छांचे फलक लावण्यात आले आहे. कलानगर परिसरात उबाठा शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे मातोश्री निवासस्थान असून या मातोश्रीच्या अंगणात नितेश राणे (Nitesh Rane) हे मंत्री बनल्याचे बॅनर झळकवत एकप्रकारे त्यांच्या समर्थकांनी ठाकरेंना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. कणकवली विधानसभेत सलग तिसऱ्यांदा निवडून आलेले नितेश नारायण राणे आणि कुडाळ विधानसभेतून निवडून आलेले निलेश नारायण राणे (Nilesh Narayan Rane) हे निवडून आल्यानंतर त्याच दुपारी शिवसेना भवनसमोर गडकरी चौकांत त्यांच्या विजयाचे बॅनर लावण्यात आले होते.

भाजपाचे आमदार नितेश राणे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या अत्यंत गोटातील असल्याने त्यांची वर्णी मंत्रीपदी लागणार हे निश्चित मानले जात होते. त्यानुसार रविवारी नागपूरमध्ये कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली. रविवारी दुपारी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेताच लागलीच वांद्रे पूर्व येथील कलानगर पुलावर नितेश राणे (Nitesh Rane) यांना शुभेच्छा देणारे बॅनर लावण्यात आले. त्यामुळे मातोश्रीवर जाताना माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि माजी मंत्री व आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या निदर्शनास पडतील अशाप्रकारे हे बॅनर लावण्यात आले आहे.

(हेही वाचा – CM Devendra Fadnavis यांचा दिग्गजांना धक्का!)

राणे म्हणाले, हा माझ्यासाठी अविस्मरणीय क्षण

नितेश राणे (Nitesh Rane) यांच्या शपथविधीच्या कार्यक्रमाला खासदार नारायण राणे, निलेश राणे, निलम राणे आदींसह त्यांचे संपूर्ण कुटुंब उपस्थित होते. यावेळी खासदार नारायण राणे यांना प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी नितेश राणे (Nitesh Rane) यांनी कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेण्याचा हा क्षण माझ्यासाठी अविस्मरणीय असल्याचे सांगितले. आजवर मी मंत्रीपदाची अनेक पदे भुषवली,पण माझ्या मुलाने कॅबिनेट पदाची शपथ माझ्या समोर घेणे यापेक्षा वेगळा आनंद काय असेल असे ते म्हणाले.

निलमताईंनी मानले सिंधुदुर्गवासिंयांचे आभार

नितेश आज राज्याचा कॅबिनेट मंत्री बनला आहे, हे काम सोपे नाही याची मला कल्पना आहे. आज आमच्या राणे कुटुंबासाठी हा आनंदाचा क्षण आहे आणि विशेषत: सिंधुदुर्गातील तमाम जनतेचे आभार मानते की त्यांनी जो विश्वास नितेशवर दाखवला आणि तीन वेळा निवडून आणले आणि आज जो तो मंत्री बनतो हे माझ्या सिंधुदुर्गातील जनतेच्या प्रेमामुळे. त्यामुळे सिंधुदुर्गातील सर्व जनतेचे मी आभार मानते असे त्या म्हणाल्या.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.