ज्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्रात येतील, त्यावेळी महाविकास आघाडी हे झाडाच्या पत्त्यासारखी कोसळेल, अशी टीका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केली.
महायुतीचे नुकतीच बैठक पार पडली. त्यात ठरल्यानुसार १४ जानेवारीला म्हणजेच मकरसंक्रातीच्या दिवशी महायुतीचे एकत्रित मेळावे होणार आहेत. जानेवारीत जिल्हास्तरीय, फेब्रुवारीत विभागस्तरीय आणि मार्च महिन्यात राज्यस्तरीय मेळावे होणार आहेत. महाराष्ट्रात महायुतीच्या माध्यमातून राज्यातील प्रत्येक बूथपर्यंत, मतदान केंद्रावर आणि तालुका पातळीवर एकसंघपणे महायुती काम करेल. लोकसभा निवडणुकीत राज्यात 51 टक्के मते घेऊन महायुती जिंकेल. लोकसभेचा कोणताही उमेदवार ठरविण्याचे अधिकार राज्यातील नेत्यांना नाही. याबाबत केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड निर्णय घेईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे समन्वयाने केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डशी बोलणे करुन आगामी काळात निर्णय घेतील, असेही बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले.
Join Our WhatsApp Community