Lok Sabha Elections : ‘ईव्हीएम’चा मुद्दा गेला बासनात!

208
Lok Sabha Elections : ‘ईव्हीएम’चा मुद्दा गेला बासनात!

शिवसेना नेते उद्धव ठाकरे तसेच अनेक विरोधी पक्षाच्या नेत्यांनी ईव्हीएम मशीनबाबत शंका उपस्थित करत भाजपाकडून ईव्हीएमच्या माध्यमातून मतांचा घोटाळा होत असल्याचा आरोप अनेकदा केला गेला आहे. मात्र काल, मंगळवारी ४ जूनला लोकसभा निवडणूक निकाल महाविकास आघाडीच्या बाजूने लागताच एकाही नेत्याने ‘ईव्हीएम’चे नाव चुकूनही काढले नाही किंवा बॅलेट पेपरवर मतदान घ्या, अशी मागणी पुढे केली नाही. (Lok Sabha Elections)

ईव्हीएमचा मुद्दा बासनात!

लोकसभा निवडणूक निकालानंतर राज्यातील काँग्रेस पक्षाला १३ जागा अधिक एक बंडखोर, शिवसेना उबाठाला ९, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाला ८ अशा महाविकास आघाडीला ३१ जागांची लॉटरी लागली. तर सत्ताधारी पक्षाच्या भाजपाला केवळ ९ जागा, शिवसेना (शिंदे) ७ आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाला केवळ १ अशा महायुतीला १७ जागांवर रोखण्यात महाविकास आघाडीला यश मिळाले आणि ईव्हीएमचा मुद्द्याला बासनात गुंडाळले गेले. (Lok Sabha Elections)

(हेही वाचा – World Environment Day : महापालिकेचा पहिला वातावरणीय अर्थसंकल्प अहवाल, मुंबई ठरले चौथे शहर)

‘ईव्हीएम’वरच नव्हे तर निवडणूक आयोगावरही टीका

उद्धव ठाकरे यांनी तर मुंबईतील मतदानाच्या दिवशी २० मे २०२४ रोजी मतदान सुरू असताना निवडणूक आयोगावर टीका करत निवडणूक आयोग हा भाजपाचा घरगडी असल्याप्रमाणे काम करत आहे, तसेच आयोगाकडून पक्षपातीपणा करण्यात येत आहे, मतदान केंद्रावर जाणूनबूजून अधिकाऱ्यांकडून वेळकाढूपणा केला जात असून मतदारांनी केंद्राबाहेरच्या रांगा पाहून कंटाळून मतदान न करताच परत जावं, असे बेछूट आरोप केले. हे भाजपचे कारस्थान असून ज्या ठिकाणी महाविकास आघाडीला मतं मिळण्याची शक्यता आहे, त्या ठिकाणी जाणूनबूजून मतदानाला वेळ लावला जातोय असाही आरोप उद्धव ठाकरे यांनी केला होता. (Lok Sabha Elections)

कारवाईची मागणी

मतदान सुरू असताना उद्धव ठाकरे कशी काय पत्रकार परिषद घेऊ शकतात असा सवाल करत मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने त्यावर कारवाई करावी अशी मागणी आशिष शेलार यांनी केली. (Lok Sabha Elections)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.