10-11 राज्य्यांमध्ये मुसलमानांना तिकीट न दिल्यास त्यांचे लोकसभेतील प्रतिनिधित्व कमी होईल. इंडि आघाडी मुसलमानांना तिकीट देत नाही. जसे महाराष्ट्रात एकूण 48 जागा आहेत; पण एकही मुसलमान उमेदवार दिलेला नाही. त्याचप्रमाणे राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, दिल्ली येथेही मुसलमान उमेदवार दिले नाही. एक दिवस असा येईल की, हिजाब घातलेली महिला भारताची पंतप्रधान होईल, असे वक्तव्य एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत केले आहे.
(हेही वाचा – Indian Army: जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलाची संयुक्त कारवाई, एका दहशतवाद्याला शस्रांसह अटक)
इंडि आघाडीकडून कोणतीही प्रतिक्रिया नाही
छत्रपती संभाजीनगर आणि हैदराबादमध्ये 13 मे रोजी मतदान होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. या वेळी ओवैसी यांनी इंडि आघाडीवर अनेक आरोप केले. आमच्या महाराष्ट्र अध्यक्षांनी एमआयएम इंडि आघाडीचा भाग बनण्याबाबत तीनदा निवेदन दिले होते. मात्र दुसऱ्या बाजूने कोणतीही प्रतिक्रिया आली नाही, असे ओवैसी म्हणाले.
यूपीमध्ये आम्ही पीडीएमचा भाग आहोत, जे मागासलेले, दलित आणि मुस्लिम आहेत. याचं नेतृत्व अपना दलाच्या पल्लवी पटेल करत आहेत. आम्ही बिहार आणि झारखंडमध्येही लढत आहोत. झारखंडमध्ये दोन जागा लढवणार आहेत. बिहारच्या किशनगंज जागेवर निवडणूक झाली असून बिहारचे पक्षाध्यक्ष निवडणूक जिंकतील . औरंगाबाद आणि हैदराबादमध्ये १३ मे रोजी मतदान होणार असून, दोन्ही ठिकाणी विजय मिळेल, असा दावा ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी केला आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community